ओबीसी संख्येवरून ठाण्यात राष्ट्रवादी आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओबीसी संख्येवरून ठाण्यात राष्ट्रवादी आक्रमक
ओबीसी संख्येवरून ठाण्यात राष्ट्रवादी आक्रमक

ओबीसी संख्येवरून ठाण्यात राष्ट्रवादी आक्रमक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ ः ठाणे पालिकेच्या निवडणुकीत २०१७ मध्ये ओबीसींची संख्या निश्चित करून आरक्षण देण्यात आले होते. त्या वेळच्या संख्येत आता वाढ होणे अपेक्षित असताना ओबीसींची संख्या कमी कशी झाली, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे ठाणे शहाराध्यक्ष गजानन चौधरी यांनी केला आहे. २०१७ प्रमाणेच आगामी पालिका निवडणुकीत आरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी ठाणे पालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. परिणामी, प्रभागांची फेररचना करण्याचेही धोरण अंगीकारले जाण्याची दाट शक्यता आहे. साधारणपणे महाराष्ट्रात ओबीसींच्या ३५४ जाती आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा कायदेशीर अंगाने अभ्यास करावा; तसेच २०१७ प्रमाणेच ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यासाठी ठाणे शहरातील ओबीसी जात समूहांची फेरगणना करून प्रभाग आरक्षित करावेत, अशी मागणी राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलकडून करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89861 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top