परिचारिकांचे रुग्‍णस्‍नेही मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परिचारिकांचे रुग्‍णस्‍नेही मार्गदर्शन
परिचारिकांचे रुग्‍णस्‍नेही मार्गदर्शन

परिचारिकांचे रुग्‍णस्‍नेही मार्गदर्शन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३: रुग्णालयातून रुग्ण घरी गेल्यावर नातेवाईकांनी रुग्णांची काळजी कशाप्रकारे घ्यावी; प्रसुतीनंतर महिला घरी गेल्यावर बाळाच्या आरोग्याची घेण्यात येणारी काळजी, असे रुग्णस्नेही मार्गदर्शन जे. जे. रुग्णालयातील परिचारिका आता रुग्णालयातून घरी गेलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना करू शकणार आहेत. वायओएस एड तसेच नुरा हेल्थ यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णांच्या काळजीचे प्रशिक्षण येथील परिचारिकांना देण्यात आले. त्यामुळे डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा मिळणार आहे.

जे जे रुग्णालयातील परिचारिकांना रुग्णांची काळजी घेण्याचे धडे प्रशिक्षणातून देण्यात आले. याचा वापर त्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या रुग्णांसंबंधित समस्या सोडवण्यासाठी करणार आहेत. या प्रशिक्षणामध्ये फ्लिपचार्ट, जेवणाची थाळी कशी असावी, स्तनाचे मॉडेल माहितीपत्रक, बाहुली, व्हाट्सॲप व्हिजीटींग कार्ड आदी विविध व्हिडीओच्या माध्यमातून देण्यात आली. फ्लिपचार्टमध्ये प्रसुतीपूर्व आणि प्रसुतीनंतरची आई व बाळांची काळजी घेण्यासंबंधीत फोटोंचा समावेश आहे. त्याचवेळी लहान मुलांचे किंवा गर्भवती महिलांना आजार झाल्यास त्याची लक्षणे कशी ओळखावी याबाबतची संपूर्ण माहिती चार्टस तसेच व्हिडीओजमार्फत देणार येणार आहे. यामुळे त्यांना वारंवार रुग्णालयात येण्याची गरज भासणार नाही.
प्रशिक्षण उपयुक्त
रुग्ण महिलांना त्यांच्या खासगी आजारासाठी व्हॉटसॲप नंबर देण्यात आला आहे. या नंबरवर मिसकॉल दिल्यास तज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन मिळणार आहे. यावर नुरा हेल्थ आणि वायओएस एडचे डॉ. अभिमन्यु कोतवाल यांनी परिचारिकांना प्रशिक्षण देऊन रुग्णांच्या शंकाचे निराकरण करण्याचे मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. तर, जेजे रुग्णालयाच्या मेट्रेन योजना बेलदार यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. यातील माहितीपुस्तीका, चार्टस यांचा समावेश असल्याने त्याचा दीर्घकाळासाठी उपयोग होईल. शिवाय, रुग्ण ही आजारांसबंधी लक्षणे ओळखून रुग्णालयास लवकरात लवकर संपर्क करू शकतील. या कार्यक्रमाचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी केले असून, हे प्रशिक्षण उपयुक्त असल्याचे डॉ. सापळे म्हणाल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89862 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..