''करून दाखवलं''च्या नादातील प्रयोग उत्तम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''करून दाखवलं''च्या नादातील प्रयोग उत्तम
''करून दाखवलं''च्या नादातील प्रयोग उत्तम

''करून दाखवलं''च्या नादातील प्रयोग उत्तम

sakal_logo
By

डोंबिवली, ता. २२ ः तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार काही महिन्यांपूर्वी त्रंबकेश्वर तालुक्यातील शेंद्री पाडा येथे उभारलेला लोखंडी पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. यावरून मनसे आमदार राजू पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना लक्ष केले असून ''करून दाखवलं''च्या नादात जो तात्पुरता प्रयोग केला होता तो चांगला होता. मात्र, टिकेल असे करायला हवे होते असा टोला लगावला. या वेळी ते संवाद कार्यक्रमात बोलत होते.

मनसेविचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या संवाद कार्यक्रमाला शुक्रवारी राजू पाटील यांनी उपस्थिती लावली होती. या वेळी ते बोलत होते. राजू पाटील म्हणाले की, शेंद्री पाडा येथील तास नदीवरील लोखंडी पूल पुरात वाहून गेला आहे. त्यामुळे आता तेथील महिलांना पुन्हा लाकडी बल्ल्यांवरून पाण्याचे हंडे घेऊन कसरत करावी लागत आहे. तत्कालीन मंत्री अदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार दोन दिवसात प्रशासनाने येथे पूल उभारला होता. मात्र हा पूल वाहून गेल्यावर आदित्य ठाकरे यांनी त्याची दखल घेतली नाही. परंतु आता बल्ल्यांवरून जाताना एखादी महिला पडून अपघात होण्याची शक्यता असल्याने सरकारने यात लक्ष घालावे अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.

राज्यात सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व यंत्रणांना लवकरात लवकर खड्डे बुजवावे अशा सूचना दिल्या होत्या. या कामावर लक्ष देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स देखील उभा केला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचा टास्क फोर्स काम करताना दिसत नाही, अशा शब्दात आमदार पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

भूमिपुत्रांवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील नाव देण्यासाठी अनेक आंदोलन झाली. या आंदोलनात अनेक भूमिपुत्रांवर गुन्हे दाखल झाले. सध्या या विमानतळाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि.बा.पाटील यांचे नाव दिले आहे. परंतु आता भूमिपुत्रांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी विनंती सरकारकडे केली असल्याचे राजू पाटील यांनी सांगितले म्हणाले. तसेच कुशवली धरण प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजू पाटील यांनी कौतुक केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89876 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..