सलमान खानने घेतली पोलिस आयुक्तांची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सलमान खानने घेतली 
पोलिस आयुक्तांची भेट
सलमान खानने घेतली पोलिस आयुक्तांची भेट

सलमान खानने घेतली पोलिस आयुक्तांची भेट

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ : बॉलीवूड अभिनेता सलमान खानने आज (ता. २२) मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांची दुपारी ४ वाजता पोलिस आयुक्तालयात भेट घेतली. सलमानची पोलिस आयुक्तांशी झालेली भेट ही सदिच्छा भेट होती, त्याचा कुठल्याही प्रकरणाशी संबंध नसल्याचे पोलिस आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले. ३० जून रोजी विवेक फणसळकर यांनी पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला होता. फणसळकर यांच्या भेटीनंतर सलमान खानने पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांचीही भेट घेतल्याचे सांगण्यात आले.
गेल्या महिन्यात सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकी देणारे पत्र आले होते. याप्रकरणी वांद्रे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पत्रानंतर खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89881 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top