टॅटूचा ट्रेंड न्यारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टॅटूचा ट्रेंड न्यारा
टॅटूचा ट्रेंड न्यारा

टॅटूचा ट्रेंड न्यारा

sakal_logo
By

वैभवी शिंदे, नेरूळ

जुने ते सोने असे म्हटले जाते. जुन्या काळातील वेशभूषा, केशभूषा, गोंदवणे असे प्रकार पुन्हा नवा टच देत ट्रेंडमध्ये आले आहेत. त्यात शरीरावर गोंदवणे म्हणजेच टॅटू काढणे तरुण वर्गात सध्या ट्रेंडिंग दिसत आहे. संगीत वाद्य, देवदेवता, राशी असे टॅटू काढून घेण्याकडे क्रेझ वाढली आहे. स्टायलिश दिसण्यासाठी फक्त पुरुष वर्गच नाही तर महिलाही अशी टॅटूची हटके फॅशन करत आहेत.

आजकाल टॅटू गोंदवण्याची क्रेझ वाढल्याने कॉलेजमध्ये, प्रवासात आणि ऑफिसेसमध्ये अनेकांचा हातावर, मानेवर वगैरे टॅटू काढलेले दिसतात. अनेकांसाठी त्यांचा टॅटू हा त्यांचे स्टेटस असते. तर काहींचे टॅटू हे त्यांच्या भावनांशी जोडलेले असतात. मानवी त्वचेवर साधारण सात त्वचेचे थर असतात. त्यातील वरील तीन थरांवर टॅटू गोंदवला जातो. विविध रंगांपासून काढण्यात येणारे हे टॅटू अगदी लहान ते मोठ्या आकारांचे असतात. कारण टॅटू काढण्याची किंमत ही त्याच्या आकारवर ठरते. अगदी पाचशे रुपयांपासून कितीतरी हजार रुपयांमध्ये हे टॅटू काढून मिळतात. त्यात काही पर्मनेंट असतात तर काही टेम्पररी.

टॅटू काढताना आपल्या त्वचेवर त्याचे काही परिणाम होणार नाहीत ना हे विचारात घेऊन शक्यतो प्रोफेशन टॅटू आर्टिस्टकडून फोटो काढल्यास उत्तम ठरते. टॅटू आर्टिस्टच्या स्टुडिओमध्ये विविध टप्प्यात हे टॅटू काढले जातात. ज्यात टॅटू ड्रा करण्यापासून त्यात रंग भरून त्याला फिनिशिंग टच देण्यापर्यंत त्वचेची काळजी घेत ही प्रक्रिया केली जाते. हातावर, दंडावर, मानेवर, पाठीवर, छातीवर तसेच शरीरांच्या अनेक नाजूक भागांवरही टॅटू गोंदवले जातात. काहींचे तर शरीरभर टॅटू असतात. व्यक्तींच्या आवडीनिवडीनुसार हे टॅटू काढून देण्यात येतात. नेरूळ, वाशी, बेलापूर, खारघर अशा शहरातील भागात अनेक टॅटूचे स्टुडिओ असून तेथे तरुणपिढी ट्रेंडिंग राहण्यासाठी टॅटू काढून घ्यायला बरीच गर्दी करतात.

ट्रेंडिंग टॅटूचे अनोखो डिझाईन्स
- बाईक टॅटू - बाईक राईडिंगची आवड असणारे व्यक्तींची असे टॅटू काढण्याला पसंती असते. त्यातही अनेक आकर्षक टॅटू काढून मिळतात.
- पोट्रेट व सेलिब्रेटी टॅटू - सेलिब्रेटीचा, आई-वडील, नातलग, आपल्या प्रिय व्यक्ती यांच्या हुबेहूव फोटोंचे टॅटू काढले जातात.
- ट्रेडिशनल टॅटू - या टॅटूमध्ये पक्षी, प्राणी, फुलांचा समावेश होते. असे टॅटू शक्यतो नाजूक असल्याने ते मनगटावर काढण्याचा ट्रेंड आहे.
- थ्रीडी टॅटू - या टॅटूमध्ये कार्टून कॅरेटर्स, कार यांचे थ्रीडी टॅटू काढले जातात.
- रियालिस्टिक टॅटू - काही क्षण, आठवणी यांचे हे टॅटू असतात.
- ब्लॅक अॅण्ड ग्रे टॅटू - हे टॅटू काळ्या आणि राखाडी रंगात रंगवलेले असतात.
- ट्रॅव्हल टॅटू - भटकंतीची आवड असलेल्या व्यक्ती अशा टॅटू काढण्यास पसंती देतात.
- बँड टॅटू - हातावर काढण्यात येणाऱ्या या टॅटूमध्ये बँडचे डिझायन केले जाते.
- राशी टॅटू - आपपापल्या राशीनुसार अंगावर टॅटू गोंदवण्याचे सध्या तरुणांमध्ये मोठा ट्रेंड आहे.

टॅटू काढताना ही काळजी घ्या ः
- व्यावसायिक टॅटू आर्टिस्टकडून टॅटू काढा.
- टॅटू काढण्यापूर्वी हेपिटायटिस बी ची लस आवश्य घ्या.
- त्वचेवर इंक टेस्ट करा, जेणेकरून शाईची अॅलर्जी होणार नाही.
- टॅटूची सुई नवी आहे की नाही याची पडताळणी करा.
- टॅटू काढल्यानंतर दोन आठवडे त्या ठिकाणी पाणी लागू देऊ नका.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89906 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top