सुरवंटाचा मनवेधक प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुरवंटाचा मनवेधक प्रवास
सुरवंटाचा मनवेधक प्रवास

सुरवंटाचा मनवेधक प्रवास

sakal_logo
By

अजित शेडगे, माणगाव
रायगड जिल्हा जैवविविधतेने नटलेले आहे. पावसाळा सुरू होताच येथील निसर्ग बहरून येते. निसर्गात अनेक प्रकारचे बदल होतात. ओहोळ वाहू लागतात. रानमाळ हिरवे होते, विविध प्रकारचे कीटक, प्राणी, पक्षी दिसून येतात. यामध्ये विविध रंग व आकारांमध्ये शेताच्या बांधावर, फुलांवर, पानांवर, खोडावर दिसणारे सुरवंटही सर्वत्र दिसून येतात. सध्या जिल्ह्यातील रानावनात, डोंगरमाथ्यावर, निसर्गात सुरवंट दिसत आहेत. सुरुवातीपासूनच सुरवंट ते फुलपाखरू हा प्रवास अतिशय मनवेधक असतो.

---------
रायगड जिल्ह्याला २४० किमीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. जैवविविधता, फळबागा, अभयारण्य या सर्वांगीण प्रतिकूल परिस्थितीमुळे जिल्ह्यात रंगीबेरंगी फुलपाखरांचे नंदनवन फुलले आहे. आता पावसाळा सुरू होताच निसर्ग बहरल्याने सर्वत्र सुरवंट दिसू लागले आहेत. सुरवंट फुलपाखराचा किंवा पाकोळी अवस्थेतील किड्याचा प्रकार आहे. सुरुवातीच्या पावसात सुरवंट तयार होतात. केसाळ अळी असलेल्या सुरवंटाचे विविध आकार व प्रकार आढळतात. पूर्ण शरीरावर केस असणारे हे कीटक झाडांच्या खोडावर, पानांवर, गवतावर, धान्याच्या पातीवर आढळून येतात. काळा, निळा, सफेद, हिरवे कधी कधी संमिश्र रंगाचे सुरवंट आढळतात. सुरवंटाची लांबी ५ मिलिमीटर ते ५.७ मिलिमीटर असते. याच्या पोटाखालची बाजू सोडल्यास त्याच्या अंगावर सर्वत्र उभारलेले केस असतात. हे केस शक्यतो तंतूसारखे असतात. काही सुरवंतांच्या अंगावरील केस चकाकणारे पांढरे शुभ्र असतात.
सुरवंताचा जीवनकाळ दीड ते दोन महिन्यांचा असतो.
पावसाळ्याच्या सुरुवातीला सुरवंट दिसतात आणि अखेरीस ते समाधिस्त होतात. त्यानंतर स्वतःभोवती कोळ्याप्रमाणे कवच तयार करतात. साधारणतः एका आठवड्याच्या अंतराने त्या कवचामधून विविध रंगाच्या फुलपाखराचा जन्म होतो. बाहेर आल्यानंतर त्यांचे पंख ओलसर आणि दुमडलेले असतात. तास ते दीड तासात पंख सुकवून त्यांची हालचाल सुरू होते. त्यानंतर पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू झेप घेऊन पुढील जीवनप्रवासाला तयार होतात. साधारणत: ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत रंगीबेरंगी फुलपाखरे निसर्गात बागडताना दिसतात.
सुरुवातीपासूनच सुरवंट ते फुलपाखरू हा प्रवास अतिशय मनवेधक असतो. कारण बरीच फुलपाखरे साधारणपणे भल्या पहाटे कोषातून बाहेर येतात. पावसाळ्यात किड्यासारखा दिसणारा हा सुरवंट अखेरीस सुंदर फुलपाखरा दिसून येतो.

विषारी केस
सुरवंतांचे ९८ टक्के केस विषारी असतात. या केसांना मानवाचा कळत नकळत स्पर्श झाल्यास त्वचेवर दाह होतो. खाज येऊन पुरळ सदृश्य भाग तयार होतो. त्वचा लालसर होते. ग्रामीण भागात सुरवंटाचा त्वचेशी संपर्क आल्यास त्या ठिकाणी तुळशीच्या पानांचा रस लावतात.

सुरवंटाचे खाद्य
सुरवंट हे खोड, पान, तृण खावून उपजीविका करतात. अनेक सुरवंट एकदा एखाद्या पानावर तृणावर बसल्यास ते संपूर्ण खाऊन फस्त करतात. पिकांवर बऱ्याच वेळा यांचा प्रादुर्भाव होत असतो.

पावसाळा सुरू झाल्यानंतर जंगल परिसरात, शेताच्या बांधांवर, पाना-फुलांवर, गवतावर अनेक ठिकाणी विविध आकार, प्रकाराचे सुरवंट दिसून येत आहेत. रंगीबेरंगी सुरवंट दिसायला आकर्षक असले, तरी त्यांचा त्वचेशी संपर्क आल्यास खाज सुटणे, पुरळ उठणे असे परिणाम होतात. ग्रामीण भागात तुळशीचा पाला लावून खाजेवर प्रथमोपचार केला जातो. कधी कधी एक ते दोन दिवस ही खाज, पुरळ राहते.
- विलास देगावकर, प्राणी-पक्षी निरीक्षक माणगाव

--------------------------------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89909 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top