सीएनजीवरून रिक्षा संघटना आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीएनजीवरून रिक्षा संघटना आक्रमक
सीएनजीवरून रिक्षा संघटना आक्रमक

सीएनजीवरून रिक्षा संघटना आक्रमक

sakal_logo
By

घाटकोपर, ता. २३ (बातमीदार) ः राज्य सरकारने कर कमी केल्याने राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. त्याचप्रमाणे सीएनजीच्या दरातदेखील सूट देण्याची मागणी रिक्षा संघटनांकडून केली जात आहे.
गेल्या काही वर्षांत डिझेल, पेट्रोलसह सीएनजी, एलपीजीचे दर वाढले आहेत. त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक तसेच प्रवाशांवर होत आहे. याविरोधात विविध पातळीवर आवाज उठवला गेल्याने केंद्र व राज्य सरकारने डिझेल, पेट्रोलचे दर कमी करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे; मात्र सीएनजीचे दर मात्र चढेच असल्याने शासनाने योग्य निर्णय घेऊन दर कमी करावेत; अन्यथा वाढीव दरांविरोधात आंदोलन करू, असा इशारा रिक्षा संघटनेकडून देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया
सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर जसे कमी केले, तसेच सीएनजीचे दर कमी करावेत. मुख्यमंत्री हे स्वतः रिक्षाचालक होते. त्यांना रिक्षाचालकांच्या व्यथा चांगल्या प्रकारे माहिती असल्याने ते सहकार्य करतील, ही अपेक्षा आहे.
- राजेश हांडे, अध्यक्ष, ओम चैतन्य गगनगिरी रिक्षाचालक संघटना

दर महिन्याला सीएनजीच्या भाववाढीमुळे दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. जगण्यासाठी खर्च वाढत चालला आहे. मुलांच्या शिक्षणाची फीसुद्धा वेळेवर भरता येत नाही.
- ज्ञानेश्वर दरेकर, रिक्षाचालक

सीएनजी दरवाढीमुळे जास्त पैसे मोजावे लागत आहेत. रिक्षाची कमाई ही कमी होत चालली आहे, गाडी पासिंग, इन्शुरन्स, गाडीचा खर्च इतर वेळेवर करता येत नाही.
- विलास सावंत, रिक्षाचालक

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89912 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top