पर्यटकांना हिरव्यागार खारघरची भुरळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटकांना हिरव्यागार खारघरची भुरळ
पर्यटकांना हिरव्यागार खारघरची भुरळ

पर्यटकांना हिरव्यागार खारघरची भुरळ

sakal_logo
By

वैभवी शिंदे, नेरूळ

डोंगर, धबधबे, हिरवाई, मोठमोठी उद्याने, थीम पार्क, वास्तुशिल्प असा अनोखा ठेवा लाभलेल्या खारघरची पर्यटकांना भूरळ पडली असून पावसाळ्यात येथे निसर्गाने उथळलेले रंग पाहण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडताना दिसत आहे. मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या खारघरमध्ये मुंबई आणि उपनगरांतून मोठ्या संख्येने पर्यटक निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी गर्दी करतात. पांडवकडासह उत्सव चौक, शिल्प चौक, सेंट्रल पार्क, जलवायू विहार ही ठिकाणे खारघरमधील आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत.

्हिरव्यागार डोंगरांनी वेढलेला निवांत परिसर, पांडवकड्याच्या कुशीत डौलदारपणे वसलेले सेंट्रल पार्क, विस्तीर्ण पसरलेले गोल्फ मैदान. खारघरमधील हेच निसर्ग सौंदर्य आपल्या नजरेत साठवण्यासाठी आणि कॅमेराबद्ध करण्यासाठी लाखो पर्यटक पावसाळ्यात येथे दाखल होत आहेत. बलाढ्य रस्ते, उत्तम कनेक्टिव्हीटी यामुळे मुंबई, उपनगरे, पुणे, रायगड अशा विविध भागातून तरुण-तरुणी, मित्रमंडळी, कुटुंब येथे येऊन वर्षाविहाराचा आनंद लुटत आहेत.

पावसाळ्यात येथील पांडवकडा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक नेहमीच उत्सूक असतात. येथे धबधब्यात भिजण्याचा आनंद लुटत येथील निसर्गाचे रुपडे कॅमेराबद्ध करण्याकडे पर्यटकांचा ओढा असतो. याशिवाय पांडवकड्याच्या डोंगर पायथ्याशी हिरवेगार पसरलेले गोल्फ मैदान पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरतो. त्याच्याच समोर जवळपास २५० एकरात वसलेले सिडकोच्या आखत्यारित येणारे मोठे सेंट्रल पार्कची भव्यता तर पर्यटकांना भिरळच घालते. आच्छादलेली हिरवाई, सावली देणारी भलीमोठी झाडे, आजूबाजूला दिसणारे डोंगर यामुळे संपूर्ण सेंट्रल पार्क पाहण्याची पर्यटकांची उत्सुकता शिगेला पोहोचते. भारतीय वाद्यांची ओळख सांगणारे थीम पार्क, तेथून पुढे गेल्यावर दिसणारा मोठा तलाव या उद्यानाची शोभाच वाढतात.

सर्वत्र पसरलेले लुसलुशीत गवत, पलीकडे उंच पांडवकडा, उत्सव चौक, शिल्प चौक, जलवायू विहार ही आकर्षक ठिकाणे हे सर्व पाहून आपण शहरापासून कुठेतरी दूर एखाद्या निसर्गाने नटलेल्या गावात आलोय की काय असा अनुभव खारघर पर्यटकांना देऊन जाते. त्यामुळे अशा ठिकाणी वारंवार येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असून नवी मुंबईतील खारघर आकर्षक असे पर्यटनस्थळ ठरत आहे.

सेंट्रल पार्कची खासियत
सेंट्रल पार्कमधील ओपन थिटर, पायऱ्यांची आसनव्यवस्था, विश्रांतीसाठी उभारलेल्या झोपड्या, पाच झाडी आणि त्या झाडांच्या सावलीत बसण्यासाठी बांधण्यात आलेला दगडी पार असलेली पंचवटी या स्थळांवर वावरत पर्यटकांचा दिवस निघून जातो. फोटोसेशनसाठी या स्थळांना तरुणांची मोठी पसंती मिळते. लहानमुलांसाठीही येथे लहान-मोठे असे झोपाळे, घसरकुंड्या याचा मनमुदार आनंद घेण्याची सोय करण्यात आली आहे. उद्यानातील कारंजे लहानग्यांसाठी कुतुहलाचा विषय ठरतात. विकएंडला या पार्कमध्ये मोठी गर्दी असते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89914 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..