
कॉम्फ्युटर हार्डवेअरच्या प्रशिक्षणाची संधी
अनुसूचित जातीतील तरुण - तरुणींसाठी कॉम्प्युटर हार्डवेअरच्या प्रशिक्षणाची संधी
नवी मुंबई (वार्ताहर) : ऐरोलीतील विश्वास बहुउद्देशीय विकास संस्थेने अनुसूचित जातीतील तरुण - तरुणींसाठी कॉम्प्युटर हार्डवेअरचे प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी २ महिन्यांचा असून १८ ते ५० वयोगटातील किमान ७ वी पास प्रशिक्षणार्थींना या प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी प्रशिक्षणार्थींना आधार कार्ड, जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, २ फोटो संस्थेच्या ऐरोली सेक्टर-४ येथील कार्यालयात जमा करावे लागणार आहे. सदरचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र व २ हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. त्यामुळे अनुसूचित जातीतील जास्तीत जास्त तरुण - तरुणींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वास बहुउद्देशीय विकास संस्थेच्या अध्यक्षा यल्लवा रसनभैरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९३२३९१६५२६ वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89921 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..