दृष्‍टीक्षेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दृष्‍टीक्षेप
दृष्‍टीक्षेप

दृष्‍टीक्षेप

sakal_logo
By

ग्रामविकास अधिकारी हितेंद्र विंदे यांचे निधन
बोर्डी, ता. २३ (बातमीदार) ः बोर्डी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी हितेंद्र विंदे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले व एक अविवाहित बहीण असा परिवार आहे. डहाणू तालुक्यातील धाकटी डहाणू येथील मूळ रहिवासी असलेले हितेंद्र विंदे ऑगस्ट २०१७ मध्ये बोर्डी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी म्हणून रुजू झाले होते. १५ दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या वैद्यकीय चाचण्या व उपचार सुरू होते, अशी माहिती बोर्डी ग्रामपंचायतीचे लिपिक प्रकाश राऊत यांनी दिली.

राम परमार यांचे निधन
पालघर, ता. २३ (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार राम परमार यांचे गुरुवारी (ता. २१) रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली व पत्नी आहे. पालघर जिल्ह्यातील इंग्रजी वृत्तपत्रांत पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांमध्ये राम यांचे वेगळे स्थान होते. सर्वांशी प्रेमाचे व जिव्हाळ्याचे संबंध असलेले राम हे हसतमुख व्यक्तिमत्व होते. त्यांच्या अचानक निघून जाण्याने पत्रकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पालघरमधील जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ व अनेक अधिकारी हजर होते. त्यांच्या दोन मुलींनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

सूर्या नदीत बुडून शेतकऱ्याचा मृत्यू
कासा, ता. २३ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील धरमपूर येथील शेतकरी विष्णू गण्या डोंगरकर यांचा सूर्या नदीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी विष्णू धरमपूर येथून सूर्या नदीपलीकडे आपल्या शेतात कामानिमित्ताने गेले होते. संध्‍याकाळच्या सुमारास काम आटोपून सूर्या नदीवरील बंधाऱ्यावरून घरी परतत असताना पाय घसरून ते नदीत बुडाले. घरी उशिरापर्यंत ते आले नसल्याने घरची मंडळी त्यांचा शोध घेत होती. शेताच्या परिसरात रात्री उशिरापर्यंत शोध घेतला; पण तपास लागला नाही. शुक्रवारी सकाळच्या सुमारास धरमपूर येथील नदीच्या जवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या डोक्याला मार बसल्याच्या खुणा दिसत होत्‍या. त्यांचा मृतदेह कासा उपजिल्हा रुग्णालयात आणून पुढील कार्यवाही पोलिस करत आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व दोन मुले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89923 Txt Palghar Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..