गावठी पिस्तुलांसह दोघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावठी पिस्तुलांसह दोघांना अटक
गावठी पिस्तुलांसह दोघांना अटक

गावठी पिस्तुलांसह दोघांना अटक

sakal_logo
By

मानखुर्द, ता. २३ (बातमीदार) ः रफिक नगर भागात गावठी पिस्तूल व दोन देशी कट्ट्यांसह दोघांना शुक्रवारी (ता. २२) सायंकाळी अटक करण्यात आली. हकिकुल्ला खान (वय ३३) व आरिफ सय्यद (वय ३४) अशी त्यांची नावे असून त्यांच्याविरोधात गोवंडी शिवाजी नगर पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
रफिक नगर परिसरात दोघेजण अग्निशस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खबऱ्यांमार्फत शिवाजी नगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक अर्जुन राजाने यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक सुधाकर कांदेकर, इक्बाल शिकलगार, सहायक निरीक्षक नवनाथ काळे यांच्या पथकाने सापळा लावला होता. दोन तास वाट पाहिल्यानंतर खबऱ्यांनी केलेल्या वर्णनाचे दोघे संशयित त्या ठिकाणी दिसले. पोलिसांनी चौकशी केली असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यांची पंचांसमक्ष झडती घेतली असता हकिकुल्लाजवळ एक गावठी पिस्तूल, देशी कट्टा तसेच १२ काडतुसे; तर आरिफकडे एक कट्टा व दोन काडतूस आढळले. शस्त्रे बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्यामुळे दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी ही शस्त्रे कुठून आणली व त्यांचा वापर कशासाठी होणार होता, याचा तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89931 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..