तिसरा खाडीपूल खुला करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिसरा खाडीपूल खुला करा
तिसरा खाडीपूल खुला करा

तिसरा खाडीपूल खुला करा

sakal_logo
By

कळवा, ता. २३ (बातमीदार) ः ठाण्यातील वाहतूक कोंडीमुळे कळवेकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे खाडीवरील तिसरा पूल जेवढा झाला आहे; तेवढा तरी वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी माजी मंत्री तथा कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
सन २०१३-१४ मध्‍ये असीम गुप्ता हे ठाणे महापालिकेचे आयुक्त होते. त्‍ यावेळी कळव्याचा पहिला पूल खचल्यानंतर दुसऱ्या पुलाची निर्मिती झाली. त्‍यानंतर त्याच्यावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता त्यावर उपाय म्हणून कळवा खाडीवर तिसऱ्या पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी डॉ. आव्हाड यांनी केली होती. या मागणीला तत्कालीन आयुक्त गुप्ता यांनी हिरवा कंदील दाखवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली होती.
कळवा खाडीवरील हा तिसरा पूल आता जवळजवळ वाहतुकीसाठी तयार झाला आहे. शहरातील सध्याची परिस्थिती पाहता वाहतूक कोंडीने लोक हैराण झाले आहेत. कळव्यातील रस्त्यांवर खड्डे नसल्यामुळे अंतर्गत प्रवासासाठी नागरिकांना कुठेही अडचण येत नाही, परंतु ठाण्यात जाण्यासाठी कळवा पूल ओलांडावा लागत आहे. त्यातच ठाणे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने त्याचा ताण कळव्यातील वाहतुकीवर पडत आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कळव्यामध्ये विशिष्ट वेळेत जड वाहनांना वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे, पण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्याचा परिणाम विद्यार्थी आणि नोकरदारांना सहन करावा लागत आहे. यामध्ये सामान्य नागरिकांची काहीच चूक नाही. त्यामुळे कमीत कमी जो पूल तयार झाला आहे; तो नागरिकांच्या वापरासाठी सुरू करावा, जेणेकरून थोडीफार वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असे डॉ. आव्हाड यांनी आपल्या पत्रात म्‍हटले आहे.

पोलिस आयुक्तांनी उच्च न्यायालयाचा आदेश मानून त्या पद्धतीने वाहतुकीची व्यवस्था करायला हवी, पण हे किती वेळा आणि कोणाला सांगायचे? उच्च न्यायालयाच्या आदेशालाही केराची टोपली दाखवणार असाल तर मग तक्रारच कोणाकडे करायची? मला वाटते कायद्याचे पालन व्हायला हवे. मा. उच्च न्यायालयाचे आदेश मानायला हवेत.
- आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89933 Txt Thane Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top