पांडुरंगाची वारी एसटीला पावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पांडुरंगाची वारी एसटीला पावली
पांडुरंगाची वारी एसटीला पावली

पांडुरंगाची वारी एसटीला पावली

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : कोरोना प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षे आषाढी एकादशीला वारकऱ्यांना लाडक्या पांडुरंगाचे दर्शन घेता आले नव्हते. त्यातच यंदाच्या वारीदरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि सर्व निर्बंध हटविण्यात आल्याने एसटीची ‘लालपरी’ वारीसाठी सज्ज होती. एकादशीला वारकऱ्यांच्या रुपाने एसटीच्या ठाणे विभागाला विठुराया पावला असे म्हणावे लागणार आहे. आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी केलेल्या नियोजनातून ठाणे विभागाला तब्बल ५७ लाख २६ हजारांहून अधिकचे उत्पन्न मिळाले आहे; तर २९ हजार २५९ वारकऱ्यांची सुखरूप आणि सुरक्षित वारी घडवून आणण्यात एसटीच्या ठाणे विभागाला यश आल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोरोनाच्या प्रादुर्भावापूर्वी २०१९ मध्ये आषाढी एकादशीसाठी लालपरीच्या एकूण २९६ फेऱ्या झाल्या होत्या. त्यानंतर म्हणजे २०२० आणि २०२१ या दोन वर्षांत कोरोना निर्बंधामुळे अनेक वारकऱ्यांची वारीची परंपरा चुकली. मात्र, यंदा निर्बंध शिथिल झाल्याने ठाणे विभाग ही सज्ज झाला होता. ठाणे विभागामार्फत १६० गाड्यांद्वारे ४८८ फेऱ्यांचे नियोजन करून त्या यशस्वी ही पार पडल्या. ६ जुलैपासून केलेल्या नियोजनातून जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, वाडा अशा आठही आगारांतून ठाणे-पुणे, कल्याण-पुणे आणि कल्याण-अहमदनगर या मार्गे गाड्या धावल्या. त्याला वारकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिल्याचे पाहण्यास मिळाले. १६० गाड्यांपैकी ११० गाड्या ठाणे जिल्ह्यांतून, तर ५० गाड्या पुणे स्वारगेटहून पंढरपूरला धावल्या. ४८८ फेऱ्यांमध्ये १ लाख ६० हजार ६३१ किलोमीटर एसटीचा प्रवास झाला असून, त्या फेऱ्यांमधून २९ हजार २५९ वारकऱ्यांनी पांडुरंगाच्या नगरी धाव घेतली.
ना नफा, ना तोटा
वारकऱ्यांची माऊलीच्या प्रति असलेल्‍या ओढीतून ठाणे विभागाच्या तिजोरीत तब्बल ५७ लाख २६ हजार ४१ रुपये उत्पन्न जमा झाल्याने विठ्ठल पावला असे म्हणावे लागणार आहे. जरी हे उत्पन्न मोठे दिसत असेल तरी ते ना नफा, ना तोटा असेच असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89944 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top