भिवंडीत २०० बेडचे माता-बाल रुग्णालय.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत २०० बेडचे माता-बाल रुग्णालय..
भिवंडीत २०० बेडचे माता-बाल रुग्णालय..

भिवंडीत २०० बेडचे माता-बाल रुग्णालय..

sakal_logo
By

भिवंडी, ता. २३ (बातमीदार) : भिवंडीत २०० बेडच्या माता व बालसंगोपन विभागाच्या (एमसीएच विंग) रुग्णालयासाठी नवी इमारत उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या रुग्णालयाबरोबरच भिवंडी तालुक्यातील दिवे-अंजूर, अनगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची नवी इमारत व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने उभारण्यासही हिरवा कंदील मिळाला असल्याची माहिती केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपील पाटील यांनी दिली. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी संबंधित हॉस्पिटलच्या नव्या इमारतींच्या कामांना मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले.
भिवंडी शहर व तालुक्याची लोकसंख्या वाढत असून, स्व. इंदिरा गांधी स्मृती हॉस्पिटलवर ताण येत आहे. तसेच महिला व मुलांवर उपचार करण्यासाठी भिवंडीत उपविभागीय रुग्णालयाच्या दर्जाचे २०० बेडचे रुग्णालय उभारण्याची विनंती कपिल पाटील यांनी केली होती. तर दिवे-अंजूर, अनगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची नवी इमारत व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने उभारण्याची विनंती केली होती. यास केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे.

चौकट
भिवंडीत प्रथमच माता-बाल रुग्णालय
भिवंडी लोकसभा मतदारसंघात प्रथमच माता-बाल रुग्णालय उभारले जात आहे. यापूर्वी जिल्हा वा उपविभागीय रुग्णालयाअंतर्गत माता-बाल संगोपन विभाग कार्यरत आहे; मात्र केंद्रीय मंत्री पाटील यांच्या प्रयत्नांमुळे प्रथमच माता-बाल रुग्णालय भिवंडीत सुरू होत आहे. याचा सामान्य व गरीब पालकांना आधार मिळणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89946 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top