रक्ताच्या बहाण्याने अनेकांना गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रक्ताच्या बहाण्याने अनेकांना गंडा
रक्ताच्या बहाण्याने अनेकांना गंडा

रक्ताच्या बहाण्याने अनेकांना गंडा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : सायबर गुन्हेगारांची ‘रक्तपिपासू’ मोडस ऑपरेंडी उघडकीस आली आहे. गरजू रुग्णांना रक्त मिळवून देण्याचे आश्वासन देत ठाण्यातील प्रख्यात ब्लड लाईन या रक्तपेढीच्या नावे हजारो रुपयांचा गंडा घातला जात आहे. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हा गुन्हा दाखल झाल्यानंतरही हा प्रकार सुरूच असल्याने रक्त मिळाल्याशिवाय कोणीही कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन ब्लड लाईन रक्तपेढीच्या डॉ. शिल्पा जैन यांनी केले आहे.
ब्लड लाईन ही ठाण्यातील नामांकित रक्तपेढी आहे. अनेक गरजू रक्तपेढीमधून रक्त घेण्यासाठी तेथील ०२२-२५३७५००० या क्रमांकांवर फोन करीत असतात. साधारणपणे ‘निगेटिव्ह’ श्रेणीतील रक्त उपलब्ध नसल्यास रक्तपेढीकडून तसे रुग्णांच्या नातेवाईकांना कळवण्यात येते; मात्र त्यानंतर लगेचच ९८२७६७२५८७ किंवा ९३८२५२५६०७ या क्रमांकावरून रुग्णांच्या नातेवाईकांना फोन करून रक्त उपलब्ध असल्याचे कळवण्यात येते. रक्त मिळवण्यासाठी ऑनलार्इन लिंक पाठवून पाच रुपये पाठवण्यास सांगण्यात येते. पाच रुपये पाठवल्यानंतर पैसे पाठवणाऱ्‍याच्या बँक खात्यातील संपूर्ण रक्कम काढून घेतली जात आहे. काही रुग्णांनी ही बाब डॉ. शिल्पा जैन यांच्या लक्षात आणून दिली. विशेष म्हणजे या भामट्याकडून केवळ राष्ट्रीयीकृत बँकांच्याच खात्यांमधून पैसे पाठवण्यासाठी आग्रह केला जात असल्याचे समजते. प्रशांत ठुकरूल यांची फसवणूक झाल्यानंतर त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89947 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top