एक्स्प्रेस वे ट्रेलरला एसटी बसची धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एक्स्प्रेस वे ट्रेलरला एसटी बसची धडक
एक्स्प्रेस वे ट्रेलरला एसटी बसची धडक

एक्स्प्रेस वे ट्रेलरला एसटी बसची धडक

sakal_logo
By

पनवेल, ता. २३ (वार्ताहर) : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर उभ्या असलेल्या ट्रेलरवर पाठीमागून भरधाव वेगाने येणारी सोलापूर-अर्नाळा एसटी बस धडकल्याने झालेल्या अपघातात एसटी बस चालकाचा मृत्यू; तर १९ प्रवासी जखमी झाल्याची घटना शनिवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास कोन गावाजवळ घडली. या अपघातातील सर्व जखमींना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पनवेल तालुका पोलिसांनी ट्रेलरचालक तसेच मृत एसटीचालक या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या अपघातातील मृत एसटी चालकाचे नाव अशोक गायके (३३) असे असून तो मूळचा उस्मानाबाद येथील होता. शुक्रवारी रात्री एसटी चालक सोलापूर-अर्नाळा (विरार) ही बस घेऊन मुंबईच्या दिशेने येत होता. पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास कोन गावाजवळ एक्स्प्रेस मार्गावर मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रेलर अचानक बंद पडला. तेव्हा पाठीमागून येणाऱ्या एसटीने या ट्रेलरला जोरदार धडक दिली. या अपघातात एसटी बस चालक अशोक गायके याचा जागीच मृत्यू झाला; तर बसमधील १९ प्रवासी जखमी झाले असून त्यातील चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89959 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..