महापालिका रुग्णालयात जेवणात आढळले झुरळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका रुग्णालयात जेवणात आढळले झुरळ
महापालिका रुग्णालयात जेवणात आढळले झुरळ

महापालिका रुग्णालयात जेवणात आढळले झुरळ

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २३ (वार्ताहर) : नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणात झुरळ आढळले आहे. याबाबतचा व्हिडीओ तयार करुन तो रुग्णाने व्हायरल केला. या प्रकारानंतर रुग्णालय प्रशासनाने जेवण पुरविणाऱ्या संबधीत ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच भविष्यात असा प्रकार घडल्यास कडक कारवाई करण्याची सक्त ताकिद दिली.
वाशी येथील महापालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयात आर्थो वार्डमध्ये दाखल एका रुग्णाला दुपारच्या जेवणातील उसळीमध्ये झुरळ आढळले. त्यामुळे या प्रकाराची माहिती त्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना देऊन त्याचा व्हिडीओ तयार केला. त्यानंतर तो व्हिडीओ त्याने व्हायरल केला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या प्रकाराची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर रुग्णालय प्रशासनाची एकच धावाधाव झाली.
नवी मुंबई शहराची लोखसंख्या सुमारे १६ लाखाच्या घरात असून यातील मोठा भाग महापालिका रुग्णालयातील उपचारांवर अवलंबून आहे. या रुग्णालयात ओपीडीपासून ऑपरेशनपर्यंतची सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे या रुग्णालयात नवी मुंबईतीलच नव्हे तर मानखुर्द, गोंवडी तसेच मुंब्रा, दिवा या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपचारासाठी येत असतात.
......
वाशी येथील महापालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयात जेवणाची तपासणी करण्यासाठी किमान ५ कर्मचारी असण्याची गजर असताना, फक्त एक कर्मचारी असल्याचे या निमित्ताने उघड झाले. रुग्णालयात कर्मचारी कमी असल्याने जेवणाची योग्य पद्धतीने तपासणी होत नसल्याने काही वेळा रुग्णांच्या ताटात अनावश्यक वस्तु दिल्या जात असल्याच्या तक्रारी देखील काही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून केल्या जात आहेत.
.....
रुग्णांना जेवण पुरविणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून भविष्यात असा प्रकार घडल्यास संबधीत ठेकेदाराविरोधात कडक कारवाई करण्यात येईल अशी सक्त ताकिद देण्यात आली आहे. तसेच यापुढील काळात अशी घटना पुन्हा घडणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सुचना देखील दिल्या आहेत.
डॉ. प्रशांत जवादे, वैद्यकिय अधीक्षक, महापालिका रुग्णालय वाशी

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89960 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top