मैदानावरील काम थांबवण्याचा आयुक्तांचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मैदानावरील काम थांबवण्याचा आयुक्तांचे आदेश
मैदानावरील काम थांबवण्याचा आयुक्तांचे आदेश

मैदानावरील काम थांबवण्याचा आयुक्तांचे आदेश

sakal_logo
By

खारघर, ता. २४ (बातमीदार) : सचिन तेंडुलकर मैदानावर स्टेज आणि स्पोर्ट्स कोर्ट उभारणीचे काम सुरू आहे. मात्र भविष्यात या ठिकाणी आणखी विविध कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर कामाला स्थानिकांनी विरोध दर्शविला होता. रहिवाशांच्या निवेदनानंतर मैदानावरील स्टेज आणि स्पोर्ट्स कोर्टचे काम थांबवण्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी ठेकेदाराला आदेश दिले आहेत.

खारघर सेक्टर २१ मधील भूखंड क्र. ४२ वरील सचिन तेंडुलकर मैदानात स्थानिक खेळाडू विविध खेळ खेळण्यासाठी येत असत. मात्र पालिकेकडून या मैदानावर व्यासपीठ, लाँग टेनिस, बास्केटबॉल, फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी आणि बॅडमिंटन असे विविध खेळांचे मैदान दाटीवाटीने उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. अशामुळे विविध खेळांच्या मैदानामुळे भूखंड विभागला जाणार होता. तसेच मैदानात व्यासपीठ उभारल्यास भविष्यात राजकीय, तसेच सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचा एक प्रकारे पायंडा पडण्याची शक्यता होती. सदर मैदान खुले असावे व त्यावर कोणत्याही प्रकारचे बांधकाम उभारले जाऊ नये, अशी मागणी खेळाडूंची होती. कॉलनी फोरमच्या लीना गरड, समन्वयक मधू पाटील, ज्येष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष विनायक आव्हाड, खेळाडूंचे प्रतिनिधी डॉ. स्वामिनाथ ढवळे यांच्यासह सोसायटीच्या सदस्यांनी नुकतीच पालिका आयुक्तांची भेट घेतली होती.

सदर मैदान खेळासाठी खुले असावे, अशी मागणी सोसायट्यांची होती. मैदानावर व्यासपीठ उभारल्यास भविष्यात कार्यक्रमांचा एक प्रकारे पायंडा पडण्याची शक्यता होती. आयुक्तांनी मैदानावरील काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत.
- लीना गरड, अध्यक्षा, कॉलनी फोरम

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89971 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top