पश्चिम रेल्वेचा भंगार विक्रीत डंका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पश्चिम रेल्वेचा भंगार विक्रीत डंका
पश्चिम रेल्वेचा भंगार विक्रीत डंका

पश्चिम रेल्वेचा भंगार विक्रीत डंका

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २३ : पश्चिम रेल्वेने ‘शून्य भंगार मोहीम’अंतर्गत गेल्या सहा महिन्यांत भंगार विक्रीतून १५० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. भारतीय रेल्वेमध्ये चालू वर्षात सहा महिन्यांच्या कालावधीतील १५० कोटी रुपये महसूल गोळा करणारा पश्चिम रेल्वे हा पहिला विभाग ठरला आहे.
प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड भंगार साहित्यापासून मुक्त असल्याची खात्री करण्यासाठी पश्चिम रेल्वेने ‘शून्य भंगार मोहीम’ सुरू केली आहे. या अंतर्गत पश्चिम रेल्वेने आपल्या सर्व विभागांतून एप्रिल ते जुलै २०२२ या कालावधीत भंगार विक्रीतून १५१.७५ कोटी रुपयांच्या महसुलाची नोंद केली आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीतील ८८.९१ कोटी रुपये महसूल मिळाला होता. जो गेल्या वर्षाच्या तुलनेत ८८ टक्क्याने अधिक आहे.

भंगाराची विल्हेवाट लावल्याने केवळ महसूलच मिळत नाही, तर परिसर स्वच्छ ठेवण्यासही मदत होते. शून्य भंगार मोहीम मिशनचा एक भाग म्हणून पश्चिम रेल्वेच्या सर्व विभाग आणि विविध डेपोंवर भंगारविक्रीचा उपक्रम हाती घेतला जात आहे. गेल्या आर्थिक वर्षात पश्चिम रेल्वेने ५१३.४६ कोटी रुपयांचे भंगार विकले आहे.
- सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89981 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top