राज्यमार्गावर गुरांचे बस्‍तान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यमार्गावर गुरांचे बस्‍तान
राज्यमार्गावर गुरांचे बस्‍तान

राज्यमार्गावर गुरांचे बस्‍तान

sakal_logo
By

कासा, ता. २४ (बातमीदार) ः डहाणू-नाशिक राज्यमार्गावर सध्या डहाणू ते कासा या २५ किलोमीटर अंतरावर १० ते १२ ठिकाणी मोकाट गुरांचे कळप रस्त्यावर ठाण मांडून बसत आहेत. याचा फटका येथील वाहतुकीला बसत आहे. अचानक गुरे समोर आल्‍याने वाहनचालकांचा वाहनावरील ताबा सुटून अपघात होत आहेत; तर अनेक वेळा ही गुरे रस्‍त्‍यावरच बसून राहत असल्‍याने वाहतूक कोंडी होत आहे. यामध्ये प्रमुख्याने कासा, चारोटी, सारणी, रानशेत, गंजाड, कांदोळपाडा, आशागड, संतोषी मंदिर, सावटा या परिसराचा समावेश आहे.
येथील मुख्य रस्त्यावर ३० ते ४० मोकाट गुरे व लहान वासरांचा कळप रस्त्यावर ठाण मांडून बसलेला असतो. त्यात रात्रीच्या अंधारात या मार्गाने प्रवास करताना खूप त्रास सहन करावा लागतो. रस्ता काळा आणि त्यात अनेक गुरे काळ्या, लाल रंगाची असल्याने वाहनचालकांना पटकन लक्षात येत नाहीत आणि अपघात घडतात. यासाठी प्रशासनाने काही उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.

पशुधन पाळण्यासाठी शेतकरी अनुत्सुक
सध्या पाऊस सुरू असल्याने अनेक शेतकरी आधुनिक पॉवर टिलरच्या साह्याने शेती करीत आहेत. फारच कमी शेतकरी हल्ली पुरातन बैलजोडीच्या साह्याने नांगरणी करीत आहेत. त्यात सध्या गुरांचे चरण क्षेत्र कमी झाले आहे. अनेक जमीनमालकांनी आपली कंपाऊंड घातलीत. त्यामुळे पशुधन पाळण्यासाठी शेतकरी अनुत्सुक आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी सध्या हिरवा चारा चरण्यासाठी आपल्यकडील गुरे मोकाट सोडून देत आहेत. पावसाच्या दिवसांत ही मोकाट गुरे सगळीकडे चिखल माती, पाणी असल्याने डांबरी रस्त्यावर ठाण मांडत आहेत.

या रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात मोकाट गुरे ठाण मांडून बसत असल्याने अनेक वेळा अपघात होतात. यात वाहनचालकांना दुखापत होतेच, मात्र अनेकदा गुरेसुद्धा दगवतात. यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने या गुरांच्‍या मालकांना सूचना द्याव्यात व या गुरांचा बंदोबस्त करावा. जेणेकरून वाहनचालक तसेच गुरांनाही त्रास होणार नाही.
- निवास वरठा, गंजाड सामाजिक कार्यकर्ता

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90044 Txt Palghar Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..