दिघा स्‍थानक सुरू होण्याआधीच श्रेयवादाची लढाई! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिघा स्‍थानक सुरू होण्याआधीच श्रेयवादाची लढाई!
दिघा स्‍थानक सुरू होण्याआधीच श्रेयवादाची लढाई!

दिघा स्‍थानक सुरू होण्याआधीच श्रेयवादाची लढाई!

sakal_logo
By

वाशी, ता. २३ (बातमीदार) ः ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रस्तावित दिघा रेल्वे स्थानकाचे काम प्रगतिपथावर आहे. येत्‍या डिसेंबरपर्यंत दिघा रेल्वे स्थानकात लोकल थांबण्याची शक्यता असल्‍याचे एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे दिघा, विटावा तसेच कळवा आयटी पार्कमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांची गैरसोय दूर होईल.
दिघा रेल्वे स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात असताना येणाऱ्या पालिका निवडणुकीसह लोकसभेच्या निवडणुकीत श्रेयवादावरून लढाई होण्याची शक्‍यता आहे. दिघा रेल्वे स्थानकाच्या कामासाठी माजी खासदार संजीव नाईक यांनी मागणी केली होती. त्यानुसार पाठपुरावादेखील केला होता. त्यानंतर खासदार राजन विचारे यांनी पाठपुरावा केल्‍याने दिघा रेल्वे स्थानकाचे काम मार्गी लावले.
संजीव नाईक यांच्या कालखंडात दिघा रेल्वे स्थानकासाठी निश्चित केलेल्या जागेत खासदार राजन विचारे यांनी बदल करण्याचे सूचित केले. त्यानुसार दिघा रेल्वे स्थानक हे विटावा, तसेच कळव्यातील नागरिकांसाठी सोयीचे होईल, या दृष्टिकोनातून जागा बदलली आहे. यावरूनदेखील राजकीय तेढ वाढण्याची शक्‍यता आहे.
दिघा रेल्वे स्थानकाच्या कामाला प्रत्यक्षात २०१८ मध्ये सुरुवात झाली होती. १८ महिन्यांमध्ये रेल्वे स्थानकाचे काम होणे अपेक्षित होते; मात्र स्थानकाच्या कामामुळे बाधित झाडे हटवणे, भूमिगत विद्युत वाहिन्या, सामान चोरीला जाण्यासारख्या अडचणी आल्‍याने कामास विलंब झाला. त्‍यातच दोन वर्षे कोरोनामुळे कामगार न मिळाल्‍याने काम जवळपास बंदच होते.
सध्या पावसामुळे काम संथगतीने सुरू असले, तरी लवरकच स्‍थानकाचे लोकर्पण करण्यात येईल, असा विश्‍वास एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला आहे; मात्र स्‍थानकाच्या उद्‍घाटनावरून खडाजंगी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याप्रकरणी खासदार राजन विचारे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

दिघा रेल्वे स्थानकाची मागणी माझ्या खासदारकीच्या काळात केली होती. त्यानुसार केंद्रातून मंजुरीदेखील आली होती. दिघा रेल्वे स्थानकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी रेल्वेच्या अधिकांऱ्यांना भेटणार आहे.
- संजीव नाईक, माजी खासदार

स्‍थानकासाठी ११० कोटींचा खर्च
दिघा स्थानकातील फलाटाची लांबी २७० मीटर व रुंदी १२ मीटर असे दोन फलाट आहेत. त्यामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी दोन लिफ्ट व चार सरकते जिने तसेच चार पादचारी भुयारी मार्ग विकसित करण्यात येत आहेत. स्थानकासाठी ११० कोटी खर्च करण्यात येणार आहे. तसेच तिकीट खिडकीसाठी जी+२ च्या दोन इमारती स्थानकाच्या दोन्ही बाजूस असतील. त्यामध्ये बुकिंग ऑफिस, ४-४ तिकीट खिडक्या असतील, अशी माहिती एमआरव्हीसीकडून देण्यात आली आहे.

दिघा रेल्वे स्थानकाचा फायदा
दिघा परिसरातील नागरिकांसाठी सध्या ऐरोली किंवा ठाणे रेल्‍वे स्‍थानकातून प्रवास करावा लागतो. दिघा रेल्वे स्थानक परिसरात असणाऱ्या आयटी पार्कमधील कर्मचांऱ्यांनादेखील ऐरोली स्टेशनवरून जावे लागते. दिघा रेल्वे स्थानक सुरू झाल्यानंतर ऐरोली नॉलेज पार्क सिटीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह विटावा, गणपती पाडा, रामनगर, आनंद नगर, साठे नगर, विष्णुनगर, संजय गांधीनगर येथील नागरिकांची गैरसोय दूर होईल.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90050 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..