अनधिकृत बांधकामे पालिकेने हटवली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनधिकृत बांधकामे पालिकेने हटवली
अनधिकृत बांधकामे पालिकेने हटवली

अनधिकृत बांधकामे पालिकेने हटवली

sakal_logo
By

मानखुर्द, ता. २४ (बातमीदार) ः पांजरपोळच्या दिन क्वारी रस्त्यालगत असलेली १३ अतिक्रमणे शनिवारी पालिकेच्या इमारत व कारखाने पथकाने ट्रॉम्बे पोलिसांच्या संरक्षणात हटवली आहेत.
पालिकेच्या एम पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक १४६ मधील दिन क्वारी रस्त्यालगत २०१५ पासून अनधिकृत बांधकामे झाली होती. या बांधकामांमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली होती. त्याची दखल मानवाधिकार आयोगाने घेतली. त्यानंतर या प्रकरणी सुमोटो दाखल करत न्यायालयाने पालिकेकडे कारवाईचा अहवाल मागितला होता. त्‍यानुसार एकूण १४९ बांधकामे याठिकाणी झाली आहेत. त्यातील ९९ बांधकामांविरोधात पालिकेने कलम १५१ नुसार नोटीस दिली होती. त्यापैकी ३७ बांधकामांविरोधात कारवाईचा आदेश पारित करण्यात आला होता. त्यानुसार एम पूर्वचे सहाय्यक आयुक्त महेंद्र उबाळे यांच्या सूचनांचे पालन करत इमारत व कारखाने विभागाच्या पथकाने शनिवारी कारवाई केली. त्या कारवाईत १३ बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90052 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top