दृष्‍टीक्षेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दृष्‍टीक्षेप
दृष्‍टीक्षेप

दृष्‍टीक्षेप

sakal_logo
By

मुलुंड पश्चिमेत अनेक विकासकामे सुरू
मुलुंड (बातमीदार) ः आमदार मिहीर कोटेचा यांनी मुलुंड पश्चिमेतील विविध ठिकाणी विकासकामांचा प्रारंभ केला. मुलुंड पश्चिमेतील हनुमान पाडा, शिवाजी टेकडी एरिया येथे बालवाडी नूतनीकरणाचा प्रारंभ, निर्मल पाडा येथे असलेल्या खुल्या सभागृह मंडपाच्या कामाचा प्रारंभ, घाटीपाडा येथील खुल्या सभागृह मंडपाचा आणि लादीकरणाच्या व बोरवेलच्या कामाचा प्रारंभ, मुलुंड फायर ब्रिगेड एलबीएस मार्ग येथील वॉल पेंटिंग व सुशोभीकरणाच्या कामाचा प्रारंभ, मुलुंड राम अपार्टमेंट एन. एस. रोड, तांबे नगर येथे ड्रेनेज व पेव्हर ब्लॉकच्या कामाचा प्रारंभ नुकताच करण्यात आला. याप्रसंगी माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे, माजी नगरसेविका समिता विनोद कांबळे, महिला विभाग अध्यक्षा दीपिका संदेश घाग, वॉर्ड अध्यक्ष सरोज झा, सचिव गणेश पांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

घाटकोपरमध्ये आरोग्य चिकित्सा शिबिर
घाटकोपर (बातमीदार) ः ‘स्वस्थ घाटकोपर सुंदर घाटकोपर’ या ब्रीदवाक्याला अनुसरून व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शाह यांनी नागरिकांसाठी खासदार मनोज कोटक यांच्या प्रमुख उपस्थितीत मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर आयोजित केले होते. या आरोग्य शिबिरात विविध प्रकारच्या चाचण्या मोफत करण्यात आल्या, तसेच ज्या नागरिकांच्या ईसीजीमध्ये काही बदल निदर्शनात आले त्यांची ॲंजिओग्राफी व अँजिओप्लास्टी मोफत करण्यात येणार आहे. सदर शिबिर मुंबई वैद्यकीय आघाडी संलग्न फोर्टिस हॉस्पिटल व मुंबई वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉ. स्मिता काळे यांच्या विशेष सहकार्याने करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये अशोक राय, रवी पुज, विनायक कामत, भालचंद्र शिरसाट, विकास कामत, जय देसाई, अजय बागल, अनिता अतीतकर यांच्‍यासह सर्व वार्ड अध्यक्ष, युवा मोर्चा व महिला मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच फोर्टिस हॉस्पिटलच्या डॉक्टर व नर्सेस उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90060 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top