अमित ठाकरे यांची अभ्यासिकेला भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमित ठाकरे यांची अभ्यासिकेला भेट
अमित ठाकरे यांची अभ्यासिकेला भेट

अमित ठाकरे यांची अभ्यासिकेला भेट

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. २४ (वार्ताहर) ः येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी भेट दिली. या वेळी ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. उल्हासनगरात ही अभ्यासिका उभी राहावी म्हणून मनविसेने पाठपुरावा केला होता.

रविवारी (ता. २४) अभ्यासिकेला भेट देत अमित ठाकरे यांनी दीडशे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच, कर्णबधिर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यवाटप केले. मनविसेचे बंडू देशमुख, मनोज शेलार यांनी या अभ्यासिकेसाठी पाठपुरावा केला होता. तेव्हा २०१६ मध्ये तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांच्या हस्ते अभ्यासिकेचे भूमिपूजन करण्यात आले होते. २०१८ मध्ये तिचा लोकार्पण सोहळा झाला होता. याप्रसंगी आमदार राजू पाटील, ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, सरचिटणीस संदीप पाचंगे, अखिल चित्रे, सायली सोनावणे, जिल्हाध्यक्ष सचिन कदम, शहराध्यक्ष बंडू देशमुख, उपजिल्हा सचिव संजय घुगे, उपजिल्हा अध्यक्ष प्रदीप गोडसे, सचिव शालिग्राम सोनावणे, मनविसेचे शहराध्यक्ष मनोज शेलार, शहर संघटक मैनुद्दीन शेख, महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधी विभाग कल्याण लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष व मनविसेचे उपाध्यक्ष ॲड. कल्पेश माने, उपशहर अध्यक्ष ॲड. अनिल जाधव, सचिन बेंडके, मुकेश शेठपलाणी, सुभाष हटकर, अनिल जाधव, शैलेश पांडव आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90064 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top