म्हसळा तालुक्यात वीजमीटरचा तुटवडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हसळा तालुक्यात वीजमीटरचा तुटवडा
म्हसळा तालुक्यात वीजमीटरचा तुटवडा

म्हसळा तालुक्यात वीजमीटरचा तुटवडा

sakal_logo
By

म्हसळा, ता. २५ (बातमीदार) : वीजबिल वसुली करण्यात तत्पर असलेली महावितरण कंपनी ग्राहकांना सेवा देण्यास मात्र तत्परता दाखवत नाही. यात अनेक समस्यांनी ग्राहक त्रासलेले आहेत. घरगुती वापराचे मीटर बंद असूनही अनेक ग्राहकांना हजारो रुपयांची बिले आकारली गेली आहेत. तक्रार केल्यास थोडीफार तफावत दाखवून वीजबिल भरणा करण्यासाठी तगादा लावला जात आहे.
तालुक्यात नवीन वीज मीटर उपलब्ध करण्यात महावितरण अपयशी ठरत आहे. त्यामुळे अनेक भागांत नवीन वीज मीटर व जोडणीसाठी ग्राहकांना एक ते दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. नादुरुस्त मीटरही बदलले जात नसल्याने ग्राहकांना अवास्तव सरासरी देयक भरूनही मनस्ताप सहन करावा लागत आहे. तालुक्यात सुमारे २० हजारांच्या आसपास वीजग्राहक आहेत. त्यापैकी दीड ते दोन हजार मीटर नादुरुस्त आहेत. नादुरुस्त मीटरमुळे ग्राहकांना अंदाजे बिल आकारले जाते. काही घरे बंद, तर काही ग्राहकांचा वापर हा अत्यंत कमी प्रमाणात असतो, अशांनाही वाढीव बिल येत आहे. नवीन मीटर बसवून मिळावा, यासाठी मागील कित्येक वर्षांपासून अर्ज केलेले आहे; मात्र कार्यालयात मीटर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे खेडोपाड्यातील ग्राहकांकडून संताप व्यक्त होत आहे.


नादुरुस्त झालेले वीज मीटर बदलण्यासाठी ग्राहकाने अर्ज केला असता वीज कर्मचाऱ्याकडून बदलण्यास टाळले जात आहे. आम्ही तुमचा मीटर आधी तपासून बघू, त्यानंतरच बदलून देऊ, असे सांगून वेळ मारून नेतात. त्यामुळे वीजग्राहकांमध्ये नाराजी आहे.
- नंदू शिर्के, शिवसेना माजी तालुकाप्रमुख

काही महिन्यांपासून वीजमीटर उपलब्ध नसल्याने मीटर बसवणे शक्य होत नाही. जसजसे मीटर उपलब्ध होतील, तसे ग्राहकांना तत्काळ पुरवठा करण्यात येईल.
- श्री. पटवारी, सहायक अभियंता, म्हसळा उपविभागीय कार्यालय

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90085 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top