ऐरोली-काटई उन्नत मार्गावर नवी मुंबईकरांसाठी स्वतंत्र मार्गिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Airoli-katai elevated
नवी मुंबईकरांसाठी स्वतंत्र मार्गिका

ऐरोली-काटई उन्नत मार्गावर नवी मुंबईकरांसाठी स्वतंत्र मार्गिका

वाशी - ऐरोली-काटई उन्नत मार्गावर चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी नवी मुंबईकरांसाठी मार्गिका ठेवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. याबाबत मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) महापालिकेला कळवण्यात आले आहे. आमदार गणेश नाईक यांनी केलेला पाठपुराव्याला यश आले आहे. त्यांनी पालिका आयुक्त व एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांबरोबर अनेकदा पाहणी दौरा केला होता. नवी मुंबईसाठी मार्गिका न ठेवल्यास काम बंद पाडण्याचा इशारा दिला होता.

मुंबई, नवी मुंबईतून कल्याण, डोंबिवलीकडे जाताना महापेला वळसा घालून जावे लागते. त्यामध्ये तास दीड तासांचा वेळ जातो. नागरिकांचा वेळ वाचावा, यासाठी एमएमआरडीए ऐरोली-काटई उन्नत मार्ग बांधण्यात येत आहे. या अंतर्गत नवी मुंबईत बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलावर नवी मुंबईकरांसाठी डोंबिवली आणि मुंबई अशा दोन्ही बाजूंनी चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिका बांधण्याची मागणी सर्वप्रथम ऐरोलीचे प्रथम आमदार संदीप नाईक यांनी केली होती. त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात त्यांनी त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्यानंतर विद्यमान आमदार गणेश नाईक यांनी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. या मार्गिका ठेवण्यासाठी सुरुवातीला नकारघंटा वाजविणाऱ्या एमएमआरडीएला उड्डाणपुलाचे काम बंद करण्याचा इशारा दिला होता. विधानसभेत आक्रमक भूमिका घेत ऐरोली-काटई मार्गाचा नवी मुंबईकरांना वापर झालाच पाहिजे, असे ठणकावून सांगितले होते.

ऐरोली-काटई मार्गाचा पाहणीदौरा करत एमएमआरडीएकडे पत्रव्यवहार केला. नवी मुंबई पालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांना पालिकेच्या वतीने एमएमआरडीएकडे मार्गिकांसाठी ठोस बाजू मांडण्याची मागणी केली होती. त्यानुसार आयुक्त बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेतल्या. आमदार नाईक यांची मागणी आयुक्त बांगर यांनी अधिकाऱ्यांना अवगत केली. अखेर एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी मार्गिका बांधण्याचे मान्य केले आहे. यामुळे नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ऐरोली-काटई उन्नत मार्गामध्ये नवी मुंबईकरांना चढण्या व उतरण्यासाठी मार्गिकेचा उल्लेख नाही. त्यामुळे नव्याने निविदा प्रक्रिया राबवून काम करण्यात येणार आहे.
- अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90129 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Navi Mumbairoute