
कचरा पेटीला पर्याय द्यावा
कांदिवली, ता. २५ (बातमीदार) ः कांदिवली पूर्वेला पोयसर हा प्रचंड लोकवस्ती असलेला विभाग आहे. गावदेवी या मुख्य अरुंद मार्गावर कचरा पेटी बांधण्यात आली आहे. कचरा पेटी तीन फूट उंचावर असल्याने कचऱ्यासह दुर्गंधीचा नाहक त्रास स्थानिकांसह, प्रवासी आणि वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. याबाबत पालिकेने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कांदिवली पूर्व पोयसर विभागात गावदेवी मार्ग अतिशय अरुंद आहे. या मार्गावर प्रचंड गर्दी असते. गावदेवी मार्गाच्या खालून पोयसर नाला वाहतो. या पुलावरच तीन फूट उंचीवर कचरा पेटी बांधण्यात आली आहे. पालिकेकडून दोन वेळा कचरा उचलण्यात येतो, मात्र त्या व्यतिरिक्त साठलेला कचरा मार्गावर पडतो. पावसाळ्यात कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो, तसेच दुर्गंधी पसरते. उंचावर कचरा पेटी असल्याने प्रवाशांना नाक बंद करूनच प्रवास करावा लागतो. कचरा संकलन करण्याची योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मी नुकताच निवृत्त झालो आहे. जागा रिकामी आहे. सध्या सुमरा यांच्याकडे बोरिवलीसह कांदिवलीचे अधिकार दिले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना सांगतो.
- जयेश देसाई, अधीक्षक घनकचरा व्यवस्थापन आर/दक्षिण
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90146 Txt Mumbai Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..