वीर जवान पुरस्कारांचे आज वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीर जवान पुरस्कारांचे आज वितरण
वीर जवान पुरस्कारांचे आज वितरण

वीर जवान पुरस्कारांचे आज वितरण

sakal_logo
By

तुर्भे, ता. २५ (बातमीदार): देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या विविध समस्या सोडविण्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या वीर जवान फाऊंडेशन संस्थेच्या वतीने दरवर्षी वीर जवान पुरस्कार दिला जातो. कारगिल विजयी दिनाचे औचित्य साधत मंगळवारी (ता.२६) वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात सायंकाळी ५ वाजता या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.
देशाच्या रक्षणासाठी वीरमरण पत्करणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांचा मानपत्र, गौरव चिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरव करण्यात येणार आहे, तसेच देशाच्या सीमेवर देशाची अहोरात्र सेवा करणाऱ्या जवानांनाही मानपत्र, गौरवचिन्ह देऊन सन्मानित केले जाणार आहे. यासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यांतील जवानांना निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पार्श्वगायक शंकर महादेवन, नवी मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त विजय नाहटा, तसेच वीर जवान फाऊंडेशनचे संस्थापक/सल्लागार ब्रिगेडियर सुधीर सावंत (निवृत्त) उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला नवी मुंबईकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष हवालदार सुरेश काकडे (निवृत्त) यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90156 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..