सांडपाण्याचे रस्त्यावर ठाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांडपाण्याचे रस्त्यावर ठाण
सांडपाण्याचे रस्त्यावर ठाण

सांडपाण्याचे रस्त्यावर ठाण

sakal_logo
By

खारघर, ता. २५ (बातमीदार) : शहरात सध्या सिडकोकडून रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम केले जात आहे. त्यामुळे रस्त्यावरील मॅनहोल झाकले गेल्याने मलनिस्सारण वाहिन्यांचे काम करताना विविध अडचणी येत आहेत. परिणामी, पावसाळ्यात खारघर परिसरातील रस्त्यावर मलनिस्सारण वाहिन्यांतील सांडपाणी येत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली असून नुकताच पालिका आणि सिडको अधिकाऱ्यांनी नागरिकांसोबत पाहणी केली आहे.
खारघर सेक्टर चार, पाच, सात, बारा व इतरही सेक्टरमध्ये पावसाळ्यात सांडपाणी रस्त्यावर येत असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच वाढत्या दुर्गंधीमुळे त्रस्त आहेत. माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांनी या समस्येबाबत पालिका आणि सिडको अधिकाऱ्यांनी पाहणी करून मलनिस्सारण वाहिन्यांच्या या समस्येतून सुटका करावी, अशी मागणी केली. त्यानुसार बुधवारी (ता. २०) पालिकेचे शहर अभियंता संजय जगताप आणि सिडकोच्या खारघर कार्यालयाचे उपअभियंता अमित औटी यांच्यासह परिसरातील नागरिकांनी शहरातील विविध भागांची पाहणी केली.

मलनिस्सारण वाहिन्यांचा नकाशांमधून शोध
सिडकोकडून रस्त्याचे डांबरीकरण करताना मॅनहोल झाकले गेल्याची बाब अधोरेखित करण्यात आली. तसेच मलनिस्सारण वाहिन्यांत अडकलेला कचरा, प्लास्टिक पिशवी बाहेर काढता येत नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे सिडको अधिकाऱ्यांनी मलनिस्सारण वाहिन्यांच्या नकाशाचा शोध घेऊन रस्त्यावर येणाऱ्या सांडपाण्याची समस्या दूर केली जाणार आहे.

कोट :
खारघर वसाहतीत विविध ठिकाणी सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. सिडकोने येरळा आयुर्वेदिक महाविद्यालयासमोरील स्कायवॉकखाली आणि सेक्टर सातमधील नाल्यात सांडपाणी सोडले आहे. हे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात सोडण्यात यावे.
- हर्षदा उपाध्याय, माजी नगरसेविका

खारघर वसाहतीत अनेक ठिकाणी रस्त्यावर सांडपाणी येत आहे. या परिसराचा सिडको कर्मचारी, माजी नगरसेवक आणि नागरिकांसमवेत पाहणी केली आहे. तसेच कार्यकारी अभियंता गिरीष रघुवंशी यांच्याशी संपर्क साधून समस्या निदर्शनास आणून दिली आहे.
-संजय जगताप, शहर अभियंता, पनवेल महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90158 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..