खांदा वसाहतीत दुर्गंधीचे राज्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खांदा वसाहतीत दुर्गंधीचे राज्य
खांदा वसाहतीत दुर्गंधीचे राज्य

खांदा वसाहतीत दुर्गंधीचे राज्य

sakal_logo
By

कामोठे, ता. २५ (बातमीदार) : खांदा वसाहतीत मलनिस्सारण वाहिनीतील दूषित पाणी रस्त्यावर येत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नादुरुस्त मलनिस्सारण वाहिनी बदलण्याची मागणी माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड यांनी सिडकोकडे केली आहे.
खांदा वसाहतीतील मान्सूनपूर्व गटारांच्या साफसफाईची कामे व्यवस्थित झाली नसल्याने अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे. शिवाय मलनिस्सारण वाहिनींमध्ये गाळ, कचरा जमा झाला असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने नागरिकांना चालणेही अवघड झाले आहे. नवीन पनवेलमधील मशीदसमोरील आणि एमटीएनएल कार्यालयासमोरील पंप हाऊस येथून नवीन पनवेल शहरातील सांडपाणी मलनिस्सारण वाहिनीतून सोडले जाते. खांदेश्वर मंदिराजवळ या सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र हे सांडपाणी पुढे वाहून न जाता उलट दिशेला येत असल्याने रस्त्यावर दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे खांदा वसाहतीमधील नादुरुस्त मलनिस्सारण वाहिनी आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे पंपांच्या दुरुस्तीची मागणी एकनाथ गायकवाड यांनी सिडकोकडे केली आहे.

कोट-
मलनिस्सारण वाहिनीची दुरुस्तीची कार्यवाही सुरू आहे. तसेच पंप दुरुस्तीसाठी इलेक्ट्रिक विभागाला सांगितले आहे. पावसाळ्यात पाण्यामुळे अनेकदा आरोग्याच्या तक्रारी निर्माण होत असतात. तरी नागरिकांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.
- बी. एन. रामोड, कार्यकारी अभियंता, सिडको

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90160 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..