असंसर्गजन्य आजारांविरोधात पालिकेचा ‘शड्डू’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BMC
असंसर्गजन्य आजारांविरोधात पालिकेचा ‘शड्डू’ असंसर्गजन्य आजारांविरोधात पालिकेचा ‘शड्डू’

असंसर्गजन्य आजारांविरोधात पालिकेचा ‘शड्डू’

sakal_logo
By

भाग्यश्री भुवड
मुंबई : मुंबईतील एनसीडी म्हणजेच असंसर्गजन्य आजारांविरोधात पालिकेने मोहीम उघडली असून ते लवकरात लवकर नियंत्रणात यावेत, यासाठी प्रशासन तयारीला लागले आहे. आरोग्य आणि आशा सेविकांना घरोघरी जाऊन अशा आजारांविरोधात ट्रेसिंग आणि ट्रॅकिंगचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. लवकरात लवकर एचबीटी क्लिनिक सुरू करण्यात येणार आहेत. पालिकेच्या १६ रुग्णालयांमध्ये एनसीडी कॉर्नर अर्थात विशेष बुथ सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

ऑगस्टअखेरीस असंसर्गजन्य आजार आणि त्यातही मुख्य म्हणजे उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या वाढत्या रुग्णांना शोधण्याचा पालिका प्रयत्न करणार आहे. मुंबईत मधुमेहाच्या तुलनेत उच्च रक्तदाबाचे जास्त म्हणजे जवळपास ३० ते ३३ टक्के रुग्ण आहेत. त्यामुळे पालिकेच्या १६ उपनगरीय आणि काही प्रमुख रुग्णालयांमध्ये एनसीडी कॉर्नर म्हणजेच एक बुथ सुरू करण्यात येणार आहे. त्यात रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांचे उच्च रक्तदाबाचे स्क्रिनिंग केले जाईल. ऑगस्टअखेरीस एनसीडी कॉर्नर रुग्णालयांमध्ये उभारले जातील. रक्तदाब आणि मधुमेहाचे रुग्ण वाढले असल्याने त्यांच्यात जनजागृती करून त्यांचे तिथेच स्क्रिनिंग केले जाईल. मर्यादेपेक्षा जास्त रक्तदाब आढळला तर त्यांना ओपीडीत पाठवून तत्काळ उपचार केले जातील, अशी माहिती उपकार्यकारी आरोग्य अधिकारी आणि असंसर्गजन्य सेलच्या प्रमुख डॉ. दक्षा शहा यांनी दिली. रक्तदाब तपासण्यासाठी डॉक्टरची गरज नसते. पण, जीएनएम म्हणजेच जनरल नर्सरी मिडवाईस हा एक परिचारिकांचा प्रकार असतो. जे प्रशिक्षित पद्धतीने रक्तदाब तपासतील. असे दोन कर्मचारी तिथे असतील. जे दोन वेळा रक्तदाब तपासणी करतील आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने निदान करतील. त्यानंतर रुग्णावर उपचार सुरू होतील. यामुळे एनसीडीमुळे होणारे मृत्यू कमी होण्यास मदत होईल, असेही त्या म्हणाल्या.

पहिल्या टप्प्यात उच्च रक्तदाबावर लक्ष
पहिल्या टप्प्यात उच्च रक्तदाबाच्या आजारावर लक्ष केंद्रित केले जाणार असून त्याचे सर्वात जास्त रुग्ण मुंबईत असल्याचा दावा पालिकेने केला आहे. रुग्णालयाच्या एका बाजूला म्हणजेच कॉर्नरला असंसर्गजन्य आजारांची तपासणी करून घेता येईल. सध्या उच्च रक्तदाबाचे रुग्ण तपासले जातील. उच्च रक्तदाबाचे प्रमाण ३० ते ३३ टक्के आहे. मधुमेहाचे प्रमाण १८ ते १९ टक्के आहे. प्रत्येक रुग्णालयाच्या नोंदणी केंद्राजवळ एक बुथ उभारला जाईल. नोंदणी करणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्या बुथवर रक्तदाब तपासून घ्यायचा आहे. ३० वर्षांवरील सर्व नागरिकांना ही सुविधा उपलब्ध होईल. जे रुग्ण सामान्य ओपीडीत वेगवेगळ्या कारणांसाठी दाखल झाले असतील, त्या प्रत्येकाला तपासणी करून घेता येईल. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत उपक्रम सुरू होईल.

प्राथमिक टप्प्यात १६ रुग्णालयांमध्ये सुविधा उपलब्ध होईल. यात 5 वैद्यकीय महाविद्यालय, 4 विशेष रुग्णालये आणि 7 उपनगरीय रुग्णालयांचा समावेश असेल. त्यानंतर हळूहळू विस्तार वाढवू. सध्या दवाखान्यांतही रक्तदाब वगैरे तपासता येतो. रुग्णालयांवर बराचसा भार असतो. म्हणून विशेषतः इथे बुथ तयार केले जातील.
- डाॅ. दक्षा शहा, संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी

असंसर्गजन्य आजारांचे मृत्यू
वर्ष आजार मृत्यू
२०१५ उच्च रक्तदाब ४,४८६
मधुमेह २,५४४
२०२० उच्च रक्तदाब ५,९६५
मधुमेह १६,०२१

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90187 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..