बालिकांमध्ये हार्मोनल बदलाचे वाढते प्रमाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालिकांमध्ये हार्मोनल बदलाचे वाढते प्रमाण
बालिकांमध्ये हार्मोनल बदलाचे वाढते प्रमाण

बालिकांमध्ये हार्मोनल बदलाचे वाढते प्रमाण

sakal_logo
By

मुंबई, ता. २५ : ६ ते ९ वयोगटातील मुलींमध्ये हार्मोनल बदलामुळे कमी वयातच तारुण्य येत आहे. त्यामुळे या वयातील समस्यांचे प्रमाण वाढत असल्याची नोंद वैद्यकीय तज्ज्ञ करत आहेत. या पार्श्वभूमीवर बाई जेरबाई वाडिया रुग्णालय फॉर चिल्ड्रनने दर रविवारी (७ ऑगस्टपासून) ओपीडी कॉम्प्लेक्समध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. हे शिबिर सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रौढांसह लहान मुलांमध्ये आरोग्यविषयक समस्या उद्‍भवल्या आहेत. त्यातही लहान मुलींमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वेगाने वाढत आहे, सोबतच तारुण्यात येण्याचे वयही कमी झाल्याचे चित्र आहे. हाडे आणि स्नायूंची वाढ, शरीराच्या आकारात आणि शरीराच्या पुनरुत्पादनाच्या क्षमतेचा विकास हा पूर्वीपेक्षा लवकर म्हणजेच सहा ते नऊ वयोगटापर्यंत कमी झाले आहे. त्याला वैद्यकीय भाषेत अकाली येणारे तारुण्य (प्रीकोशियस प्युबर्टी) असे म्हणतात. मुख्यत्वे वयात येणाऱ्या मुलींमध्ये मासिक पाळी, स्त्री-बीजांचा विकास, स्तनाची वाढ, जांघेत वा काखेत केस येणे अशी लक्षणे दिसून येतात. अकाली वयात अशा प्रकारे पौगंडावस्था आल्याने मुलींना समाजात वावरताना अवघडल्यासारखे वाटते. त्याचा परिणाम पुनरुत्पादक आरोग्याशी संबंधित समस्यांवर होतो.
या पार्श्वभूमीवर बाई जेरबाई वाडिया रुग्णालयामार्फत आयोजित शिबिरात ६ ते ९ वर्षे वयोगटातील मुलींमध्ये होणारे शारीरिक बदल, समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत. मुलींची तपासणी करून आणि त्यांना उपचारांसोबतच मार्गदर्शन आणि समुपदेशनही केले जाणार असल्याची माहिती बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. सुधा राव यांनी दिली.
----
सामान्यतः मुलींमध्ये सरासरी १२ व्या वर्षी मासिक पाळी येते; मात्र आता हे वय कमी होत आहे. लवकर पौगंडावस्थेबाबत आम्ही मुलींना तसेच त्यांच्या पालकांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करणार आहोत. पालकांनीही मुलींना सुरक्षित वाटण्याबाबत मदत करायला हवी.
- डॉ. मिनी बोधनवाला, सीईओ, वाडिया रुग्णालय

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90188 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..