
स्कुल व्हॅनच्या धडकेत तरूण ठार, तर नऊ शालेय विद्यार्थी जखमी
पालघर : पालघरकडून शिरगावकडे येत असताना एका भरधाव कारने सातपाटीच्या स्कुटी चालकाला उडवून नंतर विद्युत पोलला धडक दिली. या अपघातात सातपाटीमधील इंजिनिअर असलेला तरुण चेतन मेहेर याचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधून शाळेत जाणारी नऊ लहान मुलांना किरकोळ दुखापती झाल्या. शिरगावच्या चुनाभट्टी येथे सुरू असलेल्या चाणक्य ग्लोबल स्कूल या इंग्रजी माध्यमांच्या नऊ लहान मुलांना घेऊन कारचा चालक सोमवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास शिरगावच्या दिशेने भरघाव वेगाने जात होता.
याचदरम्यान सातपाटी येथील चेतन मेहेर हा तरुण स्कुटी घेऊन जात असताना त्याला कारने जोरदार धडक दिली. त्या तरुणाला रस्त्याच्या पलीकडे फेकून देत ही कार रस्त्यावर उभ्या असलेल्या विद्युत वितरण विभागाच्या पोलला धडक देऊन रस्त्यापलीकडे उलटली. ही धडक इतकी जबरदस्त होती की या धडकेने रस्त्याच्या कडेला उभा असलेला पोल खाली कोसळला. या अपघातात कारमधील मुले मात्र किरकोळ जखमी झाली. या अपघातप्रसंगी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सातपाटी पोलिस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90200 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..