उरण, पनवेलमधील मनसे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उरण, पनवेलमधील मनसे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
उरण, पनवेलमधील मनसे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

उरण, पनवेलमधील मनसे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

sakal_logo
By

उरण, ता. २६ (वार्ताहर) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार उरण व पनवेलमधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मंगेश वाजेकर, राकेश भोईर, दीपक पाटील, राजेंद्र माळी यांची उरण उपतालुका अध्यक्षपदी; तर कैलास माळी, निर्दोष गोंधळी, सुजित सोनावणे, राकेश भोईर, दीपक पाटील, नरेंद्र मोकल यांची पनवेल उपतालुका अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. तसेच उरण तालुक्यातील विभाग अध्यक्षपदी संदीप ठाकूर, निशांत ठाकूर, दीपक सुतार, कृष्णा ठाकूर, अनिल गावंड, महेश पाटील, अमर ठाकूर यांची नेमणूक करण्यात आली आहे. सदर नियुक्त्या उरणमधील मनसेच्या संपर्क कार्यालयात रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी केल्या आहेत. या वेळी रायगड जिल्हा सचिव केसरीनाथ पाटील, उपजिल्हाध्यक्ष दीपक कांबळी, प्रवीण दळवी, पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील, उरण तालुका अध्यक्ष सत्यवान भगत आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90204 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..