जीवघेण्या खड्ड्यांसाठी नागरिकच उतरले रस्त्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जीवघेण्या खड्ड्यांसाठी नागरिकच उतरले रस्त्यावर
जीवघेण्या खड्ड्यांसाठी नागरिकच उतरले रस्त्यावर

जीवघेण्या खड्ड्यांसाठी नागरिकच उतरले रस्त्यावर

sakal_logo
By

जीवघेण्या खड्ड्यांसाठी नागरिकच उतरले रस्त्यावर

अंधेरी म्हाडा जंक्शन परिसरात ‘एम्पल मिशन’चा पुढाकार

मुंबई, ता. २५ : मुंबई महापालिका रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी येईल तेव्हा येईल; पण एका नागरिकाचा जीव वाचला तरीही त्यासारखी मौल्यवान गोष्ट नाही. याचीच जाणीव ठेवत मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पडून कुठल्या वाहनचालकाच्या जीवावर बेतू नये म्हणून काही सुजाण नागरिकच रस्त्यावर उतरले आहेत. महापालिकेच्या रस्ते विभागाची वाट न पाहताच त्यांनी एकत्र येत अंधेरीतील म्हाडा जंक्शन परिसरातील खड्डे श्रमदानाने बुजवले. जवळपास दहा ठिकाणी जीवघेणे खड्डे बुजवल्याचा दावा ‘एम्पल मिशन’ संस्थेने केला आहे. अशा जीवघेण्या खड्ड्यांबाबत आणखी माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

अंधेरीतील म्हाडा जंक्शन परिसरात जवळपास दहा ठिकाणी मोठे खड्डे पडले होते. एम्पल मिशनच्या माध्यमातून ते बुजवण्यात आले आहेत. संस्थेच्या दाव्यानुसार खड्ड्यांमुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत होती. सुमार दर्जाच्या कामामुळेच रस्त्याला खड्डे पडले होते; पण दुरुस्तीच्या दृष्टीने कोणतीच कार्यवाही होत नव्हती. खड्ड्यांमुळे कोणाचा जीव जाऊ शकतो याची गंभीर दखल घेत संस्थेने खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली. खड्डे बुजवल्याने एक माणसाचा जरी जीव वाचला तर त्यासारखे मोठे कार्य नाही. त्याच उद्देशाने खड्डे भरण्यात आले. आधीच्या खड्डेमय प्रवासाच्या तुलनेत नागरिकांना सहज प्रवास करता येईल अशा स्वरूपाचा रस्ता तयार करण्याचा आमचा मानस आहे, असे संस्थेने स्पष्ट केले.

आरे उड्डाण पुलावरही दुरुस्ती
‘पॉटहोल वॉरियर्स’ संस्थेनेही गोरेगाव आरे उड्डाण पुलावर रस्त्याची खडी उखडल्याची छायाचित्रे काढून पाठवली होती. त्याठिकाणी अनेक जागी खड्ड्यांमुळे होणारा त्रासही संस्थेच्या माध्यमातून मांडण्यात आला होता. मुंबई महापालिकेने संपूर्ण रस्ता कोल्डमिक्सचा वापर करून दुरुस्त केला. त्यामुळे अवघ्या तीन दिवसांत खडी उखडलेला रस्ता गुळगुळीत झाल्याचे छायाचित्र संस्थेने शेअर केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90210 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..