प्रीमियम रेल्वेगाड्यांतील खानपान महाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रीमियम रेल्वेगाड्यांतील खानपान महाग
प्रीमियम रेल्वेगाड्यांतील खानपान महाग

प्रीमियम रेल्वेगाड्यांतील खानपान महाग

sakal_logo
By

मुंबई, ता. २५ : भारतीय रेल्वेच्या प्रीमियम रेल्वे गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. प्रीमियम रेल्वेने प्रवास करताना नाश्ता-जेवणाचा प्री-ऑर्डर नसलेल्या प्रवाशांना आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत. यासंदर्भात रेल्वे बोर्डाने नुकतेच परिपत्रक काढले आहे. धावत्या रेल्वेमध्ये जेवण वा नाश्त्याच्या ऑर्डर केल्यास सेवाशुल्क म्हणून अतिरिक्त ५० रुपये आकारले जाणार आहे.
भारतीय रेल्वेच्या राजधानी एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस, वंदे भारत एक्स्प्रेस आणि दुरांतो एक्स्प्रेस आदी प्रीमियम रेल्वे गाड्यांचे प्रवासी तिकीट आरक्षित करताना भोजनाचीही सेवा निवडता येते. अनेक प्रवासी रेल्वे तिकीट काढतानाच जेवण वा नाश्ताचे आगाऊ आरक्षण करून ठेवतात; मात्र काही प्रवासी धावत्या रेल्वेमध्ये ऑर्डर देतात. त्यामुळे ऐन वेळेवर रेल्वे गाड्यांमध्ये जेवण पुरवणाऱ्या कंत्राटदारांचे नियोजन विस्कळित होते; मात्र आता भारतीय रेल्वेने आयत्यावेळी ऑर्डर केल्या जाणाऱ्या जेवण आणि नाश्त्याच्या दरात वाढ केली आहे. प्रवाशांना त्यासाठी अतिरिक्त ५० रुपये मोजावे लागतील. १५ जुलैपासून हे नवीन दर सर्व प्रीमिअर गाड्यात लागू झाले आहे.
---
रेल्वेगाड्यांतील जेवणाचे नवे दर
राजधानी एक्स्प्रेस आणि दुरांतो एक्स्प्रेसच्या प्रथम श्रेणी वातानुकूलित डब्यात नाश्तासाठी १४० रुपयांऐवजी १९० रुपये द्यावे मोजावे लागणार आहेत. जेवणासाठी २४० रुपयांऐवजी आता २९० रुपयांचा दर असणार आहे. द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील वातानुकूलित डब्यात नाश्त्यासाठी १०५ रुपयांऐवजी १५५ रुपये द्यावे लागतील. तसेच जेवणासाठी १८५ रुपयांऐवजी २३५ रुपये द्यावे लागतील. वंदे भारत आणि तेजस एक्स्प्रेसमध्ये नाश्त्यासाठी १५५ ऐवजी २०५ रुपये, तर जेवणासाठी २४४ रुपयांऐवजी २९४ रुपये प्रवाशांना मोजावे लागतील.

चहाचे दर ‘जैसे थे’
प्रीमियम रेल्वेगाड्यांमध्ये प्रवासादरम्यान वेळेवर नाश्ता वा जेवणाची ऑर्डर देताना सेवा शुल्क म्हणून अतिरिक्त ५० रुपये द्यावे लागणार आहेत; मात्र, चहाच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आली नाही. प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच २० रुपयांमध्ये चहा वा कॉफी आनंद घेता येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90211 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..