ठाणे पालिकेसाठी शुक्रवारी आरक्षण सोडत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे पालिकेसाठी शुक्रवारी आरक्षण सोडत
ठाणे पालिकेसाठी शुक्रवारी आरक्षण सोडत

ठाणे पालिकेसाठी शुक्रवारी आरक्षण सोडत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : महापालिकेच्या २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरीता सोडत काढणे, तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पालिकेच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे शुक्रवारी (२९ जुलै) सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. तसेच शनिवारी (३० जुलै) आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात येणार आहे; तर शनिवारी ३० जुलै ते मंगळवार २ ऑगस्ट (दुपारी ३ वा.पर्यंत) आरक्षणाबाबत हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी असून हरकत व सूचना महापालिका आयुक्त यांच्याकडे निवडणूक कार्यालय, अथवा संबंधित प्रभाग कार्यालयाचे मुख्यालय येथे सादर कराव्यात, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90216 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top