अपघातानंतर झालेल्या वादात महिलेचे अपहरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघातानंतर झालेल्या वादात महिलेचे अपहरण
अपघातानंतर झालेल्या वादात महिलेचे अपहरण

अपघातानंतर झालेल्या वादात महिलेचे अपहरण

sakal_logo
By

मुंबई, ता. २५ : खार परिसरात रस्त्यावरील अपघातामुळे झालेल्या वादानंतर भावा-बहिणीने एका महिलेचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित महिला ही ब्युटीशियन असून या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आया कडवाला आणि तिचा भाऊ फैज कडवाला अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी आयाची कार शनिवारी रात्रीच्या सुमारास ब्युटीशियनच्या दुचाकीला धडकली. त्यावरून त्यांच्यात जोरदार वाद झाला. त्यानंतर आयाने तिचा भाऊ फैजला फोन लावत घटनेबाबत कळवले. काही वेळातच तो त्याच्या मित्रांसह घटनास्थळी पोहोचला. पुढे त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. तसेच महिलेची सोनसाखळी व दुचाकी हिसकावून तिला गाडीत जबरदस्ती बसवले आणि वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये गेले. तेथे पुन्हा महिलेला शिवीगाळ करून धमकी दिली. अखेर या प्रकरणात पोलिसांनी आया, फैज आणि आणखी एका व्यक्तीला अटक केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90239 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..