आयटीसी घोटाळाप्रकरणी व्यावसायिकाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयटीसी घोटाळाप्रकरणी व्यावसायिकाला अटक
आयटीसी घोटाळाप्रकरणी व्यावसायिकाला अटक

आयटीसी घोटाळाप्रकरणी व्यावसायिकाला अटक

sakal_logo
By

कुर्ला, ता. २६ (बातमीदार) ः महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागाने कुर्ला येथील एका स्टील कंपनीच्या मालकाला १८ कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे. एमजीएसटी माझगाव युनिटने पाकिझा स्टील्स आणि मायल स्टील्सचे मालक सय्यद हसन रिझवी यांना एमजीएसटीच्या तरतुदींनुसार अटक केली. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, दोन्ही कंपन्यांनी कोणत्याही वस्तू किंवा सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता बनावट पावत्या वापरून अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून आयटीसीचा दावा केला आहे. त्या पावत्यांवर आकारला जाणारा जीएसटी भरलेला नाही किंवा भरायचा नाही. आम्हाला पुढे आढळले की त्‍यांचा कोणताही व्यवसाय नव्हता. कुर्ला आणि मुंब्रा येथील त्यांच्या कार्यालयात तपासणी केली असता त्‍यांनी २०१७ ते २०१८ या कालावधीत १७.८७ कोटी रुपयांपेक्षा जास्त आयटीसीचा लाभ घेतल्‍याचेही आढळून आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90280 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..