
शालेय साहित्यावरील जीएसटी रद्द करण्याची मागणी
मुलुंड, ता. २६ (बातमीदार) ः केंद्र सरकारने १८ जुलैपासून शालेय पुस्तके व शैक्षणिक साहित्यावर १२ टक्के जीएसटी लागू केला आहे. त्यामुळे अगोदरच महाग झालेले शालेय शिक्षण अधिक महाग होणार आहे. त्यामुळेच विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याविषयी सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ भांडुपचे अध्यक्ष आणि शिक्षणतज्ज्ञ रमेश खानविलकर यांनी केंद्र शासनाने शैक्षणिक क्रमिक पुस्तके व साहित्यावर लावलेल्या जीएसटीबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारने लावलेला जीएसटी रद्द करून घ्यावा, असे लेखी पत्र देऊन विनंती केली आहे. खानविलकर याबाबत म्हणाले की, शिक्षण घेणे खूपच महाग झाले आहे. शिक्षणाचे सर्वत्र खासगीकरण झाल्याचे चित्र आहे. शासन शाळांना, महाविद्यालयांना कोणतेही अनुदान देत नसल्याने त्यांची फी भरमसाट वाढली आहे. कपड्यांचा खर्च वाढला आहे. शासनाने देशाचे भवितव्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे आवश्यक आहे. म्हणूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सामान्यांच्या आणि गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वतः लक्ष घालून केंद्र शासनाकडे आग्रह करून शैक्षणिक साहित्य व क्रमिक पुस्तकावरील जीएसटी रद्द करून द्यावा, अशी लेखी विनंती केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90281 Txt Mumbai Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..