
ध्येय निश्चित करण्यासाठी कष्ट आणी नियोजनबद्ध अभ्यास हवा ः आरती बनसोडे
प्रभादेवी, ता. २६ (बातमीदार) : आपले ध्येय निश्चित करून ते पूर्ण करण्यासाठी अपार कष्ट, नियोजनबद्ध अभ्यास व मर्यादित वेळेचा आपण कसा वापर करतो हे महत्त्वाचे असते, असे मार्गदर्शन समुपदेशक आरती बनसोडे यांनी विद्यार्थ्यांना केले.
लोककल्याणकारी राजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोल्हापूर जिल्हा रहिवासी शिवशाहू प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने ना. म. जोशी म्युन्सिपल शाळा, डिलाईल रोड, लोअर परळ येथील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या गुणवंत मुलांचा सन्मान सोहळा व विभागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळेस त्या बोलत होत्या. या वेळी बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त संजय चौकेकर, विजय रावराणे, जीवन भोसले, लोकशांती को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष विलास पाटील, जागृती मंचचे अध्यक्ष राम साळगांवकर, उद्योजक नितीन कोलगे, योगा प्रशिक्षिका प्रज्ञा पवार, ज्येष्ठ महिला प्रतिनिधी माई मंगला भोसले यांच्यासह शिवशाहू प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र देसाई, कार्याध्यक्ष राजू येरुडकर, हेमंत मोरे उपस्थित होते.
या वेळी आरती बनसोडे यांनी आजची सोशल मीडिया, मोबाईल, इंटरनेट यांचा दैनंदिन जीवनातील अतिवापर आणि त्यामुळे बंद होत असलेला बालक-पालक सुसंवाद याबाबतीत विस्तृत मार्गदर्शन यांनी केले; तर संजय चौकेकर यांनी उपस्थितांना आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींच्या विश्वासार्ह बातमीसाठी वर्तमानपत्र वाचनाचे महत्त्व सांगत, सर्वांनी वृत्तपत्र वाचावे, असे आवाहन केले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90282 Txt Mumbai Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..