अभिजीत पाटील यांची काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिजीत पाटील यांची काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदी निवड
अभिजीत पाटील यांची काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदी निवड

अभिजीत पाटील यांची काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदी निवड

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. २६ (वार्ताहर) : काँग्रेसचे युवा नेते अभिजित पाटील यांची पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अभिजित पाटील हे गेली अनेक वर्षे पनवेल शहर अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना काँग्रेसची विचारधारा शहर, तसेच ग्रामीण परिसरामध्ये पोहोचण्यासाठी काम करत आहेत. गेल्या तीन पिढ्यांपासून काँग्रेस विचारसरणीशी बांधिलकी मानणारे आमचे कुटुंब आहे. आम्ही कधीच पदाच्या अपेक्षेने पक्षकार्य केले नाही. तथापी पद हे साध्य नसून विचार रुजवण्याचे साधन आहे, अशा भूमिकेतून मी याकडे पाहतो, असे त्यांनी या नियुक्तीनंतर सांगितले. शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत पक्षश्रेष्ठींचे आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90304 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top