मेजर निलेश तांडेल झाले कर्नल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेजर निलेश तांडेल झाले कर्नल
मेजर निलेश तांडेल झाले कर्नल

मेजर निलेश तांडेल झाले कर्नल

sakal_logo
By

विरार, ता. २६ (बातमीदार) ः वसईतील नाळे, मागेला आळी येथील भारतीय लष्करात असलेले नीलेश तांडेल यांची मेजरपदावरून आता कर्नल पदावर पदोन्नती झाली आहे. जबलपूर येथे समारंभात त्यांना हा कर्नलपदाचा बहुमान प्रदान करण्यात आला. या वेळी त्यांचे कुटुंबीय, आर्मी ऑफिसर, सहकारी मित्र उपस्थित होते. मेजर नीलेश तांडेल यांची कर्नल पदावरती बढती झाल्यामुळे त्यांच्यावरती सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नीलेश तांडेल यांची ओळख
आगाशी, विरार, अर्नाळा, शिक्षण संस्थेच्या पद्मश्री भाऊसाहेब वर्तक विद्या मंदिर नाळे येथून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर वर्तक महाविद्यालयातून कला शाखेतून द्वितीय वर्ष पूर्ण केले. त्यानंतर १९९५ साली त्‍यांनी भारतीय लष्करात देशसेवेसाठी जाण्याचा निर्णय घेतला. झारखंड येथील रामगड जिल्ह्यात शिख रेजिमेंट सेंटरमध्ये दीड वर्ष त्यांनी मेहनत केली. त्यानंतर त्यांची पहिलीच पोस्टिंग ही कारगिलमध्ये झाली होती. तेथे ते दोन वर्षे होते. त्यानंतर जम्मू तीन वर्षे, नवशेरा बॉर्डर दीड वर्ष, रामगड तीन वर्षे कनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. २००८ मध्ये बंगळूरु येथे ६७ प्रशिक्षणार्थ्यांमधून दिलेल्या परीक्षेत त्यांची एकट्याची लेफ्टनंट पदाच्या प्रशीक्षणासाठी निवड झाली. वर्षभरात २००९ मध्ये आयएमए डेहराडून येथे लेफ्टनंट म्हणून प्रशिक्षण त्यांनी पूर्ण करून ते कामावर रुजू झाले. त्यानंतर २०११ ला कॅप्टन म्हणून त्यांची पदोन्नती झाली. २०१५मध्‍ये त्यांना मेजर म्हणून बढती मिळाली. २०२१ पर्यंत त्यांनी बंगळूरु येथून विविध परीक्षा दिल्या. आता पुन्हा त्यांची २४ जुलै रोजी लेफ्टनंट कर्नलपदासाठी पदोन्नती झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90306 Txt Palghar Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..