दोन वर्षानंतर ठाणे धावणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन वर्षानंतर ठाणे धावणार
दोन वर्षानंतर ठाणे धावणार

दोन वर्षानंतर ठाणे धावणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : मागील दोन वर्षांपासून कोरोना या आजाराने थैमान घातले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी लागू करण्यात आली होती. त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला. त्यानुसार दर वर्षी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येणारी ठाणे महापौर वर्ष मॅरेथॉन स्पर्धादेखील या संकटामुळे रद्द करण्यात आली होती. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. अनेक निर्बंधात शिथिलता आली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत ठाणे महापलिका प्रशासनाने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे तब्बल दोन वर्षांनंतर ठाणे धावणार आहे.
ठाणे महापालिकेच्या वतीने दर वर्षी ‘ठाणे महापौर मॅरेथॉन’ स्पर्धा आयोजित करण्यात येते. यामध्ये विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सहभागी होत असतात. ही स्पर्धा २१ किमी ते ५ किमी अंतरापर्यंतची स्पर्धा असते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा होऊ शकलेली नाही. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. अशातच महानगरपालिकेवर प्रशासकीय राजवट लागू असल्याने मॅरेथॉन स्पर्धेबाबत संभ्रमाचे वातवरण होते. अशातच पालिकेने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र व राज्य सरकारच्या वतीने मार्गदर्शक सूचनेनुसार ठाणे शहरात ठाणे महापालिका व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विविध उपक्रमांचा समावेश
देशभक्तिपर गीतगायन स्पर्धा, वक्तृत्व, निबंध, चित्रकला स्पर्धा, चित्र प्रदर्शन, नृत्य, बाईक रॅली अशा विविधांगी स्‍पर्धा घेतल्‍या जाणार आहेत. १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याच दरम्यान यामध्ये १० किमी अंतराची मॅरेथॉन स्पर्धा घेतली जाणार आहे. स्पर्धेची तारीख मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, यामुळे तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर ठाणे धावणार असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90323 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..