परदेशवारीसाठी पेणमधून ३० हजार मूर्ती रवाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परदेशवारीसाठी पेणमधून ३० हजार मूर्ती रवाना
परदेशवारीसाठी पेणमधून ३० हजार मूर्ती रवाना

परदेशवारीसाठी पेणमधून ३० हजार मूर्ती रवाना

sakal_logo
By

पेण, ता. २६ (वार्ताहर) : पेण हे गणपतीचे माहेरघर म्हणून जगात ओळख असल्याने यंदा साधारणपणे २५ ते ३० हजार गणेशमूर्ती परदेशात रवाना झाल्या आहेत. परदेशातील गणेशभक्‍तांकडून मागणी वाढल्‍याने सध्या परदेशात पाठविणाऱ्‍‌या गणेशमूर्तींवर अखेरचा हात फिरवण्याची लगबग गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये सुरू आहे.
केंद्र सरकारने सर्व वस्तूंवर जीएसटी लावल्यामुळे गणेशमूर्तींसाठी येणारा कच्चा मालही महाग झाल्याने गणेशमूर्तींच्या किमती वाढल्या आहेत; मात्र महाराष्ट्रातील नवनिर्वाचित शिंदे सरकारने उत्‍सव साजरा करण्यावरील निर्बंध शिथिल केल्याने गणेशभक्तांमध्ये उत्‍साहाचे वातावरण आहे.
दोन वर्षे कोरोनाचे संकट असल्याने गणेशोत्सववरही निर्बंध होते. यंदा कोणतीही अट नसल्याने भक्‍तांकडून गणेशोत्सव आनंदात साजरा करण्यात येणार आहे. पेण शहरासह तालुक्यातील हमरापूर, जोहे, अंतोरे, तांबडशेत, कळवे, दादर येथील अनेक कारखान्यांमध्ये गणेशमूर्ती तयार होत असून तालुक्यातील जवळपास २५ ते ३० हजार गणेशमूर्ती मॉरिशस, थायलंड, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप, अमेरिका, लंडन, बॅंकॉक आदी देशात महिनाभर आधीच रवाना होत आहेत. गतवर्षी कोरोनामुळे रखडलेल्या बाप्पाची परदेशवारीला आता जोरात सुरुवात झाली आहे. मात्र बाप्पाच्या उत्‍सवालाही महागाईचे ग्रहण लागले आहे.
जीएसटीचा भार वाढल्याने कच्च्या मालाच्या किमती वाढल्‍या आहेत. दोन महिन्यांपूर्वी पीओपी १७० रुपये होते ते आता २५० ते ३०० रुपये झाल्‍याने गणेशमूर्तींची किंमत आपोआपच वाढली आहे. किंमत वाढली तरी निर्बंध शिथिल केल्याने गणेशोत्सवासाठी भक्‍तांची जोरदार तयारी सुरू झाली आहे.

महाराष्ट्र सरकारने यंदा गणेशोत्सवातील सर्व निर्बंध शिथिल केल्यामुळे पेण तालुक्यातून साधारणपणे २५ ते ३० गणेशमूर्ती परदेशात रवाना झाल्या आहेत; मात्र जीएसटीत वाढ झाल्याने कच्च्या मालाचे भाव वाढले आहेत. त्‍यामुळे गणेशमूर्तींचे दरही वाढले आहेत.
- नीलेश समेळ, गणपती कारखाना, पेण

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90327 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..