गटारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची करडी नजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गटारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची करडी नजर
गटारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची करडी नजर

गटारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची करडी नजर

sakal_logo
By

वाशी, ता. २६ ( बातमीदार) ः आषाढ महिन्याच्या अखेर अर्थात गटारी अमावस्या साजरी करून अनेकजण महिनाभर मांसाहार वर्ज्य करतात. मात्र गटारीच्या उत्‍साहात तळीरामांच्या अतिउत्साहामुळे शहरातील सुरक्षेला गालबोट लागू नये यासाठी पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
श्रावण महिना शुक्रवारपासून सुरू होणार असल्याने बुधवार हा मांसाहार करण्याचा शेवटचा दिवस आहे. शनिवार व रविवारीदेखील पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. पावसाची संततधार सुरू असल्यामुळे मद्यपी नवी मुंबईतील पर्यटनस्‍थळे, खारघर टेकडीवर मोर्चा वळवला होता. गटारी अमावस्येनिमित्त शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार आहे. वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याबरोबरच मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. खाडी परिसर, गवळी देव, पांडवकडा आदी ठिकाणी मित्रासह पार्ट्या करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शहरात अनधिकृतपणे थाटलेल्‍या चायनीज कॉर्नरवरही मद्यपीचा सुळसुळाट होण्याची शक्‍यता आहे. शहरामध्ये मुख्य रस्‍ते, चौक, रेस्टॉरन्ट व बार परिसरात गस्‍त वाढविण्यात येणार असल्‍याचे पोलिसांनी सांगितले.

गटारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मद्यपी वाहनचालकांवर करडी नजर राहणार आहे. ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने हॉटेल्स व बार आहेत, त्‍या ठिकाणी पोलिसांचे विशेष लक्ष असेल. मद्यपान करून वाहन चालविल्यास ड्रिंक अ‍ॅण्ड ड्राईव्हची कारवाई करण्यात येईल, यासाठी विशेष पथक देखील तैनात करण्यात आले आहे.
- विवेक पानसरे, उपआयुक्त, परिमंडळ १ नवी मुंबई

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90337 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top