खडवली परिसरात २६ वीज चोरीचे गुन्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खडवली परिसरात २६ वीज चोरीचे गुन्हे
खडवली परिसरात २६ वीज चोरीचे गुन्हे

खडवली परिसरात २६ वीज चोरीचे गुन्हे

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २६ ः महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील खडवली परिसरात वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत २६ जणांकडून वीजचोरी होत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी ३ लाख १५ हजार रुपये किमतीची २० हजार ३७५ युनिट वीज चोरून वापरल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्वांविरोधात मुरबाड पोलिस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयराम शंकर, भोलेनाथ तिवारी, उमेश पाटाने, नाना जंगले, विजय शुक्ला, भैरू बोंबे, विजयपाल मौर्या, गुड्डु गुप्ता, अकबर अली अन्सारी, असलम खान, दीनानाथ प्रजापती, महेश प्रजापती, ध्यानसिंग यादव, अंजनी कुमार सिंग, पंकज कनोजिया, प्रकाश कोरी, श्रीराम मौर्या, सोनमती राजभर, मुख्तार सिंग, रामशंकर गौतम, सुरज तिवारी, गीता गुप्ता, राजेश मौर्या, विकास दुबे, उज्ज्वला दासगुप्ता, राजेश पटेल अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व खडवली पूर्वमधील सीताबाई नगर येथील रहिवासी आहेत. या सर्वच ठिकाणी वीज मीटरला येणाऱ्या केबलला टॅपिंग करून वीज मीटर टाळून परस्पर वीजवापर होत असल्याचे आढळून आले आहे. उपविभागीय अभियंता गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता अलंकार म्हात्रे व त्यांच्या टीमने ही कारवाई केली. वीजचोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा व दंडाची तरतूद असून कोणत्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर करू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90341 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top