ठाणे-पालघरमधील २६२ गावे इको सेन्सेटिव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे-पालघरमधील २६२ गावे इको सेन्सेटिव
ठाणे-पालघरमधील २६२ गावे इको सेन्सेटिव

ठाणे-पालघरमधील २६२ गावे इको सेन्सेटिव

sakal_logo
By

मुरबाड, ता. २६ (बातमीदार) ः ठाणे व पालघर जिल्ह्यातील २६२ गावे पश्चिम घाट इको सेन्सेटिव्ह झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील ५७ व शहापूर तालुक्यातील ९२ गावांचा; तर पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ६२, मोखाडा २१ व जव्हार तालुक्यातील ३० गावांचा समावेश आहे. भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयातर्फे ६ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध केलेल्या विशेष राजपत्रात या गावांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

इको सेन्सेटिव्ह झोन म्हणून जाहीर करण्यात आलेल्या या गावांत रेती उत्खनन, दगडखाणी, मोठे गृह प्रकल्प, वीट भट्ट्यांवर निर्बंध लागू होणार आहेत. तसेच उद्योग उभारण्यावरसुद्धा निर्बंध आले आहेत. मात्र, या गोष्टीची स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना अजिबात माहिती मिळाली नसल्याने याविरुद्ध कोणीही आतापर्यंत तक्रार नोंदविलेली नाही, असे समजते. यापूर्वी २०१९ मध्ये भीमाशंकर ईको सेन्सेटिव्ह झोन जाहीर झाला होता. त्यामध्ये मुरबाड तालुक्यातील १५ गावांचा समावेश होता. आता पश्चिम घाट ईको सेन्सेटिव्ह झोन जाहीर झाल्याने ही संख्या वाढली आहे. लवकरच कळसूबाई, हरिश्चंद्र गड ईको सेन्सेटिव्ह झोन जाहीर होणार आहे. त्यामध्ये माळशेज घाट परिसरातील गावांचा समावेश करण्यात येणार असल्याचे समजते. उत्तरेला तापी नदी ते दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू या सहा राज्यांत हा पश्चिम घाट इको सेन्सेटिव्ह झोन जाहीर करण्यात आला आहे.
---------------------
मुरबाडमधील इको सेन्सेटिव्ह गावे
आळवे, तळेगाव, मेरदी, शिरोशी, फांगलोशी, वालिवरे, कोचरे बु., थितबी, न्याहाडी, दिवणपडा, फांगणे, मोरोशी, सावरणे, उदालदोह, करवेळे, वैशाखरे, साजगाव, पिंपळगाव, असोसे, खुटल बंगला, आंबेळे खुर्द, इंदे, हिरेघर, नांदगाव, पेंढरी, एकलहरे, माणगाव, विद्यानगर, टेंभरे बुद्रुक, सोनावळे, साजई, मढ, पाडाले, खेवारे, घोरले, कोळोशी, विढे, शिरवली, कळंभे, कळंभाड मुक्याचे, कोळे, उंबरोली खुर्द, दुधनोली, खोपिवली, राव, गणेशपूर, देहरी, उचले, गोरखगड, सिद्धगड, मोहघर, खानिवरे, काचकोली, मोहाघर, जांभुर्डे, डोंगरन्हावे, पाटगाव.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90343 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top