दिव्यात वाढीव पाणीपुरवठा सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यात वाढीव पाणीपुरवठा सुरु
दिव्यात वाढीव पाणीपुरवठा सुरु

दिव्यात वाढीव पाणीपुरवठा सुरु

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ ः मुंबई महापलिकेच्या कोट्यातील २० दशलक्ष लिटर पाणी ठाणे शहराला देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीवरून नवीन जोडणी घेत कोपरी, किसननगर आणि वागळे इस्टेट भागाला वाढीव पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यातच पाणीटंचाईमुळे त्रस्त असलेल्या दिवेकरांना साडेसहा दशलक्ष लिटर इतके वाढीव पाणी देण्यात आल्याने तेथील पाणीटंचाईची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीवरून नवीन जोडणी घेत कोपरी, किसननगर आणि वागळे इस्टेट या भागांना वाढीव २० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यात किसननगर, भटवाडी भागाला ४ दशलक्ष लिटर, वागळे इस्टेट येथीस इंदिरानगर संप हाऊसवरून पाणीपुरवठा होणाऱ्या भागांना १० दशलक्ष लिटर आणि कोपरी, आनंदनगर भागाला ६ दशलक्ष लिटर असे वाढीव पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ एमआयडीसीने दिवा भागात साडेसहा दशलक्ष लिटर इतके वाढीव पाणी उपलब्ध करून दिले आहे. त्याचा आरंभ मंगळवारी (ता. २६) खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी माजी महापौर नरेश म्हस्के आणि पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. दिवा भागातील नागरिक पाणीटंचाईमुळे त्रस्त होते. ही समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण शहराला १२० दशलक्ष लिटर इतके वाढीव पाणी दिले असून त्यातील साडेसहा दशलक्ष लिटर इतके पाणी दिव्याला उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे येथील पाणीटंचाईची समस्या आता सुटेल, अशी प्रतिक्रिया खासदार शिंदे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90357 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..