भाजपविरुद्ध काँग्रेसचे सत्याग्रह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपविरुद्ध काँग्रेसचे सत्याग्रह
भाजपविरुद्ध काँग्रेसचे सत्याग्रह

भाजपविरुद्ध काँग्रेसचे सत्याग्रह

sakal_logo
By

पालघर/भाईंदर, ता. २६ (बातमीदार) ः केंद्रातील भाजपचे मोदी सरकार राजकीय सूडबुद्धीने काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना लक्ष करीत असल्याचा आरोप करीत मंगळवारी पालघर जिल्‍ह्यात विविध ठिकाणी काँग्रेस पक्षातर्फे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. पालघर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश अधिकारी, शहराध्यक्ष मनोहर दांडेकर व काँग्रेस कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाजवळ आंदोलन केले. या वेळी तालुका काँग्रेसतर्फे पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे यांना निवेदन देण्यात आले. त्‍याचप्रमाणे मिरा–भाईंदर काँग्रेसच्या वतीने भाईंदर पश्चिम येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90359 Txt Palghar Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..